|| श्री चिन्मयमूर्ती संस्थान, उमरखेड ||

धार्मिक स्थळे

graphic footer

उमरखेड

या गावी श्रीतुकामाईंचे सद्गुरू प.पू.श्रीचिन्मयानंद महाराजांचा समाधीमठ तथा श्रीचिन्मयमूर्ती संस्थान असून हे गाव पैनगंगा नदी किनारी महाराष्ट्रातील विदर्भ प्रदेशातील यवतमाळ या जिल्ह्यात आहे. तसेच प.पू. श्रीसहजानंद महाराज व प.पू. श्रीसच्चिदानंद महाराज यांची वस्त्रसमाधी आणि श्री गुरुपीठांची गादी आहे. या गादीवर प.पू. मठाधिपती वर्षातून एकच दिवस म्हणजे भाऊबीजेला सायंकाळी बसतात व स्त्री भक्‍त त्यांना ओवाळतात. येथे मठात भक्तांची निवास, भोजन प्रसादाची नि:शुल्क व्यवस्था आहे. येहळेगाव ते उमरखेड हे अंतर एसटी बस मार्गाने सुमारे ४५ कि.मी. आहे (हदगावमार्गे). तसेच येथे श्रीचिन्मयमूर्ती गुरुपंरपरेतील प.पू. श्रीसदानंद महाराजांचे समाधी मंदिरही आहे. याशिवाय श्री आईनाथ महाराज, श्री साधू महाराज, श्री उत्तमश्लोक, श्री बालकदास आदी महान संतांची मंदिरे आहेत.

येहळेगाव (तुकाराम)

येहळेगाव (ता. कळमनुरी, जि. हिंगोली) येथे श्रीमत्‌ परमहंस श्रीतुकाराम महाराज यांचा समाधीमठ व मंदिर आहे. समाधीवरील माडीवर तुळशी वृंदावन व मठाजवळच श्री चिन्मयानंद महाराज यांचे पादुकास्थळ एका शेतात आहे. तसेच त्यांचे सत्शिष्य प.पू. श्री रामजीबापू यांचेही समाधी मंदिर जवळच आहे. श्रीतुकामाई मठात भक्तांची निवास, भोजन प्रसादाची नि:शुल्क व्यवस्था आहे.

मरडगा

येहळेगांवाहून हे गाव सुमारे दीड कि.मी. अंतरावर असून येथे श्रीतुकामाईंनी स्वहस्ते स्थापन केलेली श्रीरेणुकामातेची मूर्ती व मंदिर आहे.

माहूर (माहूरगड / मातापूर)

हे गाव येहळेगावाहून हदगाव-उमरखेड एसटी बसमार्गे सुमारे ९५ कि.मी. अंतरावर तर उमरखेडाहून सुमारे ५0 कि.मी. अंतरावर आहे. येथे जगन्माता श्री रेणुकादेवीचे मंदिर, अवधूतचिंतन श्री गुरुदेवदत्तांचे मंदिर, अत्री-अनसूया मंदिर तसेच सुप्रसिद्ध संतकवी श्री विष्णुदास यांचा मठ आहे. श्री विष्णूदास महाराजांना श्री नित्यानंद महाराजांद्रारे संन्यासदीक्षा मिळाली होती व चतुर्थाश्रमातील त्यांचे नामाभिकरण श्री पुरुषोत्तमानंद स्वामी असे होते.

औंढा नागनाथ

हे गाव येहळेगावाहून हिंगोलीमार्ग हिंगोली-परभणी बसमार्गावर अंदाजे ६५ कि.मी. अंतरावर आहे. हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक मानले जाते. येथे शिवमंदिर आहे. संत श्रीनामदेव महाराज यांना त्यांचे गुरू श्रीविसोबा खेचर यांच्याद्वारा येथेच अनुग्रहप्रापती झाली.

नरसी (नामदेव)

संत श्रीनामदेव महाराजांचे जन्मस्थान व मंदिर असलेले हे गाव येहळेगावाहून हिंगोलीमार्ग अंदाजे ६५ कि.मी. अंतरावर आहे. येथे श्रीगुरुदेवदत्त स्वरूप प.प.श्री श्रीवासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) महाराज यांचा चातुर्मास इ.स. १९0५ साली संपन्न झाला होता. येथेच त्यांच्याद्वारा दत्तसंप्रदायातील प्रासादिक, प्रभावी आणि वरद अशा असलेल्या करुणात्रिपदीची रचना करण्यात आली.

हिंगोली

हे येहळेगावचे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण येहळेगावाहून ३७ कि.मी. अंतरावर आहे. हे गाव कयाधू नदीतीरी वसलेले असून येथे पोळा मारोती मंदिराच्या मागेच श्री उपेंद्रस्वामी (बापू) यांनी स्थापन केलेल्या श्रीतुकामाईंचा पादुकामठ आहे. तसेच जवळच उमरखेड संस्थानचे श्रीराममंदिरही आहे.

नांदेड

गोदावरी नदीकाठी वसलेले, पवित्र ठिकाण मानले जाणारे नांदेड हे मराठवाड्यातील एक जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असून, हे गाव येहळेगावाहून ५७ कि.मी. अंतरावर आहे. तसेच शिखांचेही हे पवित्र ठिकाण (हिंदूंच्या काशीसारखे) अमृतसर खालोखाल मानले जाते. येथे श्री गुरुगोविंदसिंगांची समाधी व गुरुद्वार आहे.

शेवाळा

या गावी श्रीतुकामाईंचे गुरुबंधू प.पू. श्रीपूर्णानंद महाराज (रावसाहेब /रामचंद्र महाराज) यांची समाधी व मठ आहे. विद्यमान मठाधिपती प.पू. श्री श्याम महाराज वारंकर हे आहेत. हे गाव येहळेगावाहून कामठा फाटा-आखाडा बाळापूरमार्गे अंदाजे १३-१४ कि.मी. अंतरावर आहे, तर आखाडा बाळापूर्‍रपासून अंदाजे ३-४ कि.मी. अंतरावर आहे व येथे खासगी ऑटोने जाता येते.

सुकळी (वीर)

श्री तुकामाईंचे आजोळ तथा जन्मग्राम. हे गाव नांदेड-हिंगोली रोडवरील वारंगा फाटा या गावापासून मुख्य स्स्त्यापासून जामगव्हाण मार्गे आतमध्ये अंदाजे ५ ते ६ कि.मी. अंतरावर आहे. येथे जाण्या-येण्यासाठी खासगी ऑटोरिक्षा वारंगा फाट्याहून उपलब्ध होतात. येथे श्रीतुकामाईंचे पादुका मंदिर आहे. नांदेडहून वारंगा फाटा अंदाजे ३५ कि.मी. अंतरावर आहे. येहळेगावाहून सुकळी अंदाजे ३२-३३ कि.मी. अंतरावर आहे. वारंगा फाट्यावरून नांदेडकडे जात असताना अंदाजे १-११/, कि.मी. अंतरावर रोडच्या उजव्या बाजूला जामगव्हाण एस.टी. बसथांबा आहे. तेथून आत ५-६ कि.मी. अंतरावर सुकळी (वीर) हे गाव आहे. न श्री तुकामाई पादुका मंदिर, सुकळी (वीर)

पुसद

विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील तालुक्‍याचे मुख्यालय असलेले हे गाव उमरखेडहून सुमारे ४0 कि.मी. अंतरावर असून एस.टी. बसने जोडलेले आहे. येथे प.पू. श्रीचिन्मयानंद महाराजांचे गुरू प.पू. श्रीविठ्ठल किंकर महाराज यांचे समाधी मंदिर आहे. तसेच श्री तुकामाईंच्या पादुका व मूर्ती असलेला एक मठ आहे (शीळामंदिर). याशिवाय श्रीनृसिंह देवतेचे अतिप्राचीन भव्य मंदिर आहे.

कोथळा

हे गाव उमरखेडहून सुमारे १३ कि.मी. अंतरावर ता. हदगाव, जि. नांदेड येथे असून येथे प.पू. श्रीविठ्ठल किंकर महाराजांचे गुरू प.पू.श्री एकनाथ नाना महाराज तसेच त्यांचेही गुरू प.पू.श्री नागया महाराज यांचे समाधी मंदिर आहे. तसेच प.पू.श्री एकनाथ नाना महाराज यांचे शिष्य श्री भिकमशहा वली (सूफी संत) यांचा दर्गा आहे. हे गाव पैनगंगा नदीच्या तीरावर वसलेले असून येथे श्रीचिन्मयमूर्ती संस्थान उमरखेडच्या मठाधिपतींना ते शिव झाल्यानंतर पैनगंगा नदीकाठी जलसमाधी देण्यात येते. उमरखेडहून मार्लेंगावला खासगी ऑटोने जाऊन तेथून पायी नदी ओलांडून या गावी जातात. तसेच हदगावहून सुद्धा या गावी जाण्यासाठी खासगी ऑटो आहेत. श्री नानादेव महाराजांच्या संजीवन समाधीचा जीर्णोद्धार करण्यात आला असून भव्य सभामंडप बांधण्यात आला आहे. सदरील सभामंडपात वै.प.पू. श्री वामनानंद महाराज यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे. याशिवाय श्रीदत्त व श्रीगणेश मूर्तीचीही प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे.

कुर्तडी

श्री तुकामाईंचे वडील श्री. काशीनाथपंत उन्हाळे यांचे हे गाव. ते येथे शिक्षक होते व थोडी जमीनही त्यांना होती. नांदेड- हिंगोली रोडवर वारंगा फाट्यापासून अंदाजे ३-४ कि.मी. अंतरावर आणि हमरस्त्यापासून अंदाजे २ कि.मी. अंतरावर आत हे गाव आहे. येथे श्री. जोशी कुर्तडीकरांनी स्थापिलेले श्री रेणुकामाता मंदिर आहे.

केसापुरी (ता. माजलगाव, जि. बीड)

माजलगावहून ५ कि.मी. अंतरावर असलेल्या या गावी श्री सहजानंद स्वामींचे अधिकारी शिष्य श्री शंकरानंद महाराज यांचा समाधी मठ आहे. तसेच या गावात श्री केशबराजांचे प्राचीन मंदिरही आहे.

मंजरथ (ता. माजलगाव)

गोदावरी व सिंदफणा नद्यांच्या संगमावर वसलेले हे तीर्थक्षेत्र माजलगावहून ११ कि.मी. अंतरावर असून येथे गुरू परंपरेतील श्रीरामानंद महाराजांचे जलसमाधी स्थळ आहे. तसेच येथे पुरातन श्री त्रिविक्रमाचे मंदिरही आहे. हे गाव दक्षिण प्रयाग म्हणूनही प्रसिद्ध आहे.

लाखबापतरा (ता. वैजापूर, जि. औरंगाबाद)

येथे गोदातीरी प. पू. श्री सहजानंद महाराजांचे जलसमाधी स्थळ असून नदीच्या पैलतीरी पुणतांब्याचे श्री चांगदेव महाराज मंदिर आहे. पुणतांब्याहून शिर्डी १५ कि.मी. आहे.

बाराशिव व करंजाळा (जि. परभणी)

ही दोन्ही गावे लागून लागूनच असून बाराशिव येथील श्री मारुतीरायाच्या मूर्तीची स्थापना श्री सहजानंद महाराजांनी केली आहे. करंजाळा येथे श्रीकर्णेश्‍वर महारुद्र मंदिर आहे.