|| श्री चिन्मयमूर्ती संस्थान, उमरखेड ||

लेख संग्रह

graphic footer
श्री सदानंद महाराजांची पुण्यतिथी

श्री सदानंद महाराज की जय 

आज  कार्तिक कृ. ८ , बुधवार ,  दिनांक  १६.११.२०२२. आज श्री चिन्मयमूर्ती संस्थान उमरखेड गुरुपीठाच्या गुरुपरंपरेतील  
आदीगुरु श्री सदानंद महाराजांची पुण्यतिथी आहे. 

ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं ।
व्दंद्वातीतं गगनसदृश्यं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् ।।
एकंनित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षीभूतं ।
भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ।।

अथादि आदीनाथस्य मीन - गोरक्षमेवच ।
मुक्ता वटेश्वरश्चैव चक्रपाणिरितिस्मृतः ।।

विमला चांगदेवस्य जनार्दनस्य नरहरीः ।
ह्रदयानंद विश्वेशो केशवराज महामुनिः ।।

बोपया हरिदासस्य तस्य सुतस्य कान्हयः। 
सदानंदस्य कृष्णस्य कृष्णसुतपरंपराः।। 

श्यामसुंदरानंतस्य .....................
गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ।। 

श्री सदानंद महाराजांचा समाधीमठ हा उमरखेड येथेच असून तो श्री चिन्मयमूर्ती संस्थान उमरखेडच्या अधिनस्त आहे. 
हे दोन्हीही मठ जवळ जवळच असून श्री सदानंद महाराजांच्या समाधीची दररोज पूजा -  अर्चा , अभिषेक , उपासना 
ही श्री चिन्मयमूर्ती संस्थान मठाचे  वे.शा.सं. श्री उदयगुरुजी जोशी  वारेगावकर हे नियमितपणे करीत असतात. 

श्री सदानंद महाराजांच्या श्रीचरणीं माझे कोटी कोटी प्रणाम .

संकलन :- डॉ. डी.डी.देशमुख कामठेकर , पुणे .

सदानंद महाराज की जय. चिन्मयानंद महाराज की जय .