|| श्री चिन्मयमूर्ती संस्थान, उमरखेड ||

लेख संग्रह

graphic footer
जय गुरुमहाराज की जय प पु वामनानंद महाराज की जय

परमहंस सिद्ध योगी,येहळेगावी तुकाराम।
तुकाराम म्हणता मुखे,होईल तुमचे पूर्ण काम ।। धृ ।।
येहळेगाव पंढरपूर,येहळेगाव गोंदवले।
तुकामाई या संताने गाव पूर्ण पावन केले।।
जिथे जिथे तुकमाई , त्या ठीकानी माझा राम।। 
तुकाराम म्हणता  ।।१ ।।

कानटोपी डोईवरती, अंगे साजे बंडी साधी ।
परमहंस सन्यासी ते,ब्रम्हचारी ऐसी गादी ।। 
चारी मुक्ती यांच्या चरणी, यांच्या चरणी चार धाम।
तुकाराम म्हणता ।।२ ।।

तुपेगावी सावकारे ,तुकामाईसी कोंडीले।
खोलीतून होई गुप्त,उसाच्या मळ्यात आले।।
बदले रूप क्षणोक्षणी ,कधी करती विश्रांम ।।
तुकाराम म्हणता ।।३ ।।

दास बाळकृष्ण लोळे , तुकारामाच्या चरणी।
कृपा होणे या संतांची, घडो ऐसी काही करणी ।।
तुकाराम वदता वाचे$$$$ तुकाराम तुकाराम तुकाराम $$$।।४ ।।

तुकाराम म्हणता मुखे, चळ चळ कापे यम।
परमहंस सिद्ध योगी ,येहळेगावी तुकाराम।।

रचयिता... श्री बोर्डे गुरुजी, परभणी.