|| श्री चिन्मयमूर्ती संस्थान, उमरखेड ||

लेख संग्रह

graphic footer
श्रीसद्गुरु वामनानंद महाराज , उमरखेड यांचे संक्षिप्त चरित्र

आज ज्येष्ठ कृ. ९ , बुधवार , दिनांक २२.६.२०२२ .आज प.पू.श्री वामनानंद महाराज यांची पुण्यतिथी. त्यांच्या श्रीचरणीं माझे कोटी कोटी प्रणाम .


श्री औदुंबर ग्राम स्वर्ग दुसरे भासे जनां भूवरी ।
जेथे चिन्मयमूर्तीचा मठ असे त्या रम्य पीठावरी ।।
झाले सद्गुरु शांत दांत सुमती ब्राह्मण्य भक्तार्थी हा ।
श्री सद्गुरु वामनानंद वंदन तुम्हां साष्टांग भावें सदैव ।।

श्री चिन्मयमूर्ती संस्थान उमरखेडचे मठाधिपती श्री पुरुषोत्तमानंद महाराजांनंतर श्री सद्गुरु वामनानंद महाराज हे मठाधिपती पदावर विराजमान झाले. हे पूर्वाश्रमीचे श्री भगवानराव एकनाथराव देशमुख , रहाणार सिरसाळा ,  ता. परळी , जि. बीड . , जन्म शके १८३०. हे बालब्रह्मचारी होते . 

श्रीसद्गुरु वामनानंद महाराजांनी उमरखेड व येहळेगाव मठांत अनेक वर्षे खडतर सेवा केली. हजारों शिष्यांना अनुग्रहित करुन त्यांचे जीवन धन्य केले. बीड जिल्ह्यातील मूळचे   उत्तरेश्वर पिंप्रीचे थोर विभूति प्रातःस्मरणीय  वै. पू. श्री ज्ञानेश्वर महाराज माऊली ( समाधीमंदिर चाकरवाडी जि.बीड ) हे त्यांचे अनुग्रहित महान शिष्य होते. 

श्रीसद्गुरु वामनानंद महाराजांचे शेकडों - हजारों शिष्यांना श्रीमहाराजांच्या हयातीतच  दिव्यानुभव प्रचितीस आलेले आहेत , आजही त्यांच्या समाधीग्रहणानंतरही येत असून यापुढेही येत रहाणार. त्यांच्या कृपाशीर्वादामुळे अनेक रोगी  असाध्य रोगांतून व्याधीमुक्त झाले, अनेकांची मोठमोठी संकटें निवारण झाली , निपुत्रिकांना संतानप्राप्ती झाली , अनेक शिष्यांच्या मुलां - मुलींची लग्नकार्यें झाली, अनेकांना नोकरी , धंदा , व्यवसाय , उद्योग प्राप्त होऊन त्यांत सुयश प्राप्त झाले असून सर्व शिष्य व भक्त मंडळींचे सर्व  मनोरथ पूर्ण झाले आहेत. 

श्री वामनानंद महाराजांनी ज्येष्ठ कृ. ९ , शुक्रवार , शके १९२३ ( दिनांक १५.६.२००१) रोजी आपली अवतारसमाप्ती केली व ते ब्रह्मानंदीं लीन झाले. श्री सद्गुरु वामनानंद महाराजांच्या श्रीचरणीं माझे कोटी कोटी प्रणाम. 

मायेची बहु संपदा न गणतां योगी यती जाहला ।
सिरसाळा शुभ ग्राम त्यागूनी महापंथास या लागला ।।
श्री औदुंबरग्रामक्षेत्रीं रमला पुरुषोत्तमाच्या पदां ।
श्री सद्गुरु वामनानंद वंदन तुम्हां साष्टांग भावेंनी सदा ।। 

........................................

संकलन :- डॉ. डी.डी.देशमुख कामठेकर , औरंगाबाद .

धन्यवाद. चिन्मयानंद महाराज की जय .