|| श्री चिन्मयमूर्ती संस्थान, उमरखेड ||

श्री वामनानंद महाराज

graphic footer

श्री औदुंबरग्राम स्वर्ग दुसरे, भासे जना भूवरी ।
जेथे चिन्मयमूर्तीचा मठ असे, त्या रम्य 'पीठावरी ।।
झाले सद्गुरू शांतदांत सुमति, ब्राह्मण्य भक्तार्ती हा ।
श्री सद्गुरू वामनानंद वंदन तुम्हां, साष्टांग भावे सदा ।॥।

श्रीपुरुषोत्तमानंद महाराजांनंतर श्रीवामनानंद महाराज हे उमरखेडच्या मठाधिपतीपदावर विराजमान झाले. हे पूर्वाश्रमीचे श्री. भगवानराव एकनाथराव देशमुख, रा. सिरसाळा, ता. परळी, जि. बीड. हे बालब्रह्मचारी होते. श्रीसद्गुरू वामनानंद महाराजांनी उमरखेड व येहळेगांव मठात अनेक वर्षे खडतर सेवा केली. हजारो शिष्यांना अनुग्रहित करून त्यांचे जीवन धन्य केले. बीड जिल्ह्यातील चाकरवाडीचे थोर विभूती वै. पू. श्री ज्ञानेश्‍वर महाराज माऊली हे त्यांचे अनुग्रहित महान शिष्य होते. श्रीवामनानंद महाराजांच्या कृपाशीर्वादामुळे अनेक शिष्यांच्या मुला-मुलींची लग्नकार्ये जुळली. अनेकांना नोकरी- धंद्याच्या निमित्ताने उपजीविकेचे साधन प्राप्त झाले. तसेच भक्‍त- शिष्यांना संतानप्राप्ती, व्याधीहरण व संकटमुक्ती अशा दिव्य अनुभूती प्राप्त आहेत. श्रीमहाराजांनी ज्येष्ठ कृ. ९ शके १९२३ रोजी आपली अवतार समाप्ती केली. पैनगंगा नदीतिरी कोथळा, ता. हदगाव, जि. नांदेड येथे त्यांना जलसमाधी देण्यात आली.