|| श्री चिन्मयमूर्ती संस्थान, उमरखेड ||

श्री शिवरामानंद महाराज

graphic footer

भक्ती ज्याने केली, मारुतीसमान ।
जनसेवा करी, मातेसमान ।।
संन्यास घेतला, गादीचे भूषण ।
शिवरामानंद हे, नामाभिधान ॥।

(श्री. अशोकराव उपाध्ये, औरंगाबाद)

श्री सच्चिदानंद महाराजानंतर श्री शिवरामानंद महाराज हे उमरखेडच्या गादीवर बसले. हे पूर्वाश्रमीचे श्री शिवराम साकबरे (ताकबरे), मालेगाव, ता. बसमत, जि. हिंगोली. ते बालब्रह्मचारी होते. अत्यंत वैराग्यशील श्रीशिवरामानंद महाराजांनी मातेच्या ममतेने आजारी व्यक्‍ती व रोग्यांची शुश्रूषा केली. नामसंकीर्तनाकडे त्यांचा जास्त कल होता. नावाप्रमाणेच ते शिव म्हणजे वैराग्याचे प्रतीक, मारुतीसारखे भक्‍त आणि रामासारखे मर्यादा पुरुषोत्तम, दयेचा सागर व अत्यंत मायाळू होते. हजारो भक्तांना त्यांनी सन्मार्गाकडे वळविले. मार्गशीर्ष व. १४ शके १८२३ रोजी त्यांनी नश्वर देहाचा त्याग करून कैवल्य स्थितीस प्राप्त झाले. त्यांना मार्लेगावजवळील पैनगंगा नदीत जलसमाधी देण्यात आली.