श्री पुरुषोत्तमानंद महाराज
आता काही न मागणे गुरुवरा भक्तास तू एकला ।
आशीर्वाद तुझा असो सतत की, द्यावी
मति निर्मला ।॥।
सर्वांच्या मनीचे हरूनि सदया, किल्मिष
नि आपदा ।
भावे वंदन हे असो सतत त्या
पुरुषोत्तमाच्या पदा ।।
श्रीवासुदेवानंद महाराजांनी आपल्या हयातीतच श्रीपुरुषोत्तमानंद महाराजांना मठाधिपतीपदावर विराजमान केले. ते पूर्वाश्रमीचे श्री लिंबाजी नाईक नेब, रा. श्रीजांबसमर्थ, ता. घनसावंगी, जि. जालना. थोर मातृभक्त श्रीपुरुषोत्तमानंद स्वामींनी उमरखेड व येहळेगांव मठात अतिशय खडतर सेवा केली. त्यांच्या कृपेने अनेकांचे व्याधीहरण, महापुरातून प्राणरक्षण, गंभीर अपघातातून रक्षण झाले. अनेकांना नोकऱ्या लागल्या. शिष्यांवरील खोटे आळ दूर करून त्यांचे निर्दोषत्व सिद्ध केले आणि चातुर्मासांद्रारे हजारो शिष्यांना परमार्थाकडे वळविले. मार्गशीर्ष शु. ४ शके १९0३ साली श्रीपुरुषोत्तमानंद महाराज अनंतात विलीन झाले. त्यांना कोथळा येथील पैनगंगातिरी जलसमाधी देण्यात आली.