|| श्री चिन्मयमूर्ती संस्थान, उमरखेड ||

श्री पूर्णानंद महाराज, शेवाळा

graphic footer

गो-भूमी धन-धान्य-वैभव
द्विजां देवोनि संतोषिले ।
भावे षडूस अन्नदान करूनि
सर्वांस संतर्पिले ।।
प्रेमे गौरविले गुरु अतिथीला
वंदूनिया तत्पदा ।
पूर्णानंद पदास वंदन असो,
माझे सदासर्वदा ।।

श्री पूर्णानंद महाराज हे श्री तुकामाईंचे गुरूबंधू होत. हे कंदकुर्तीच्या (जि. निजामाबाद) श्रीधर महाराजांचे अवतार होते. पूर्वाश्रमीचे श्री रामचंद्र सदाशिवपंत पांडे. मूळचे कामारीचे. नंतर नेवरी व शेवटी शेवाळ्याला स्थायिक झाले. अन्नदान व नामस्मरणावर त्यांचा भर होता. त्यांनी एका शिष्याच्या मृत बालिकेस जिवंत केले. चिमूटभर पीठात साठ लोकांची क्षुधातृप्ती केली. यज्ञयाग आणि विपुल अन्नदान करून जनसामान्यांना परमार्थाकडे वळविले. त्यांचे थोर अधिकारी शिष्य म्हणजे प.पू. श्री आप्पाजी महाराज पाटणबोरीकर. ज्येष्ठ व. २ शके १८0८ रोजी कयाधू नदीच्या तिरी शेवाळा येथे ते समाधीस्थ झाले. येथे त्यांचा मठ असून प.पू. श्री श्याम महाराज वारंगकर हे विद्यमान मठाधिपती आहेत.