|| श्री चिन्मयमूर्ती संस्थान, उमरखेड ||

श्री नित्यानंद महाराज

graphic footer

संन्यास दीक्षेचा मंत्र सांगितला ।
भक्त विष्णूदास संतकवी झाला ।।
जीभेवर वास सरस्वतीने केला ।
उभे नित्यानंद भक्‍त कल्याणाला ।।

(श्री. अशोकराव उपाध्ये, औरंगाबाद)

श्रीशिवरामानंद महाराजांनंतर श्री चिन्मयमूर्ती पीठाच्या गादीवर श्री नित्यानंद महाराज विराजमान झाले. हे पूर्वाश्रमीचे श्री बळवंतराव (रावसाहेब) काशिनाथराव देशपांडे, रा. चांडोल, ता. खामगाव. नोकरीनिमित्त मोठ्या हुद्यावर मोगलाईत आले. ते उत्तम लेखक व कडक अंमलदार होते. पत्नी निधनानंतर त्यांना वैराग्य प्राप्त होऊन ते उमरखेडला श्री सच्चिदानंद महाराजांकडे आले व मठाचा कारभार पाहू लागले. त्यांच्या कारकीरदींत उमरखेड व येहळेगांवच्या देवालयांचे शिखर बांधण्यात आले. त्यांनी उमरखेड मठाच्या इमारतीत खूप वाढ व दुरुस्ती करून घेतली. मठाची भरभराट करून भक्तांसाठी सोयीसुविधा निर्माण केल्या. श्रीनित्यानंद महाराजांनी श्रीमाहूरगड निवासिनी श्री रेणुकामाता व श्री गुरुदेबदत्त प्रभूंचे परमभक्त संतकवी श्री विष्णूदास महाराज यांना संन्यास दीक्षेचा प्रेषोच्चार मंत्र माघ शु. १0० शके १८२३ रोजी देऊन त्यांचे नामाभिकरण पुरुषोत्तमानंद स्वामी असे केले. श्री विष्णूदास महाराजांनी देवीच्या अनेक आरत्या, अष्टके रचलेली आहेत, जी आपण नवरात्रात म्हणत असतो. त्यांना साक्षात्‌ श्री रेणुकामाता व श्रीगुरुदेव दत्तप्रभू यांची दर्शने व साक्षात्कार झालेले आहेत.

भक्तांचे कल्याण हेच ज्यांच्यासमोर ध्येय होते, असे स्वामी श्री नित्यानंद महाराज श्रावण व. त्रयोदशी, शके १८३८ रोजी इहलोक सोडून आत्मस्वरूपी लीन झाले. त्यांना मालेंगावजवळील पैनगंगा नदीत जलसमाधी देण्यात आली.