श्री माधवानंद महाराज
तुझ्या सेवेने झाले मी कृतार्थ ।
तुझ्या कृपेने जीवन होते सार्थ ।।
अणू-रेणूंमध्येही आम्हां तू दिसावे ।
हे सद्गुरू माधवानंद पद वंदू भावे ।।
(सौ. मंजूषा ग. माहोरकर, सेवली)
श्रीवामनानंद महाराजांनंतर मठाधिपती पदावर प.पू. श्रीमाधवानंद महाराजांना विराजमान करण्यात आले. हे पूर्वाश्रमीचे श्री सुधाकरराव मनोहरपंत जोशी, रा. महागाव, जि. यवतमाळ. हे बालब्रह्मचारी आहेत. श्रीमहाराजांनी दोन तपांपेक्षाही अधिक काळ येहळेगांव व उमरखेड मठात सेवा केली आहे. आपल्या कार्यकालात त्यांनी नवीन बांधकाम व जीर्णोद्धाराद्वारे उमरखेड, येहळेगाव , पुसद, हिंगोली, मरडगा, करंजाळा, पंढरपूर, कोथळा आदी सर्व मठ व मंदिरांचा कायापालट केला असून भक्तांची निवास व भोजनप्रसादाची उत्तम व्यवस्था करण्यात आलेली आहे. उमरखेड येथे वेदपाठशाळा कार्यरत असून दरवर्षी उमरखेड व येहळेगाव मठात सामूहिक मौंजींचे आयोजन करण्यात येते. श्रीक्षेत्र काशी, पंढरपूर ब तुळजापूर चातुर्मासामुळे भक्तांना अनेक पवित्र तीर्थक्षेत्रांच्या यात्रा घडल्या आहेत.
प.पू.श्रीमाधवानंद महाराजांचे हजारो भक्तांना अनुभव आलेले आहेत. चमत्कार घडलेले आहेत, घडत आहेत व पुढेही घडत राहतील. त्यांचे आशीर्वाद म्हणजे वेदवाक्यच! कर्करोगासारख्या असाध्य अशा व्याधीग्रस्तांना तीर्थ-प्रसाद-अंगारा सेवनाद्वारे नवजीवन प्राप्ती, कोमामध्ये गेलेल्या भक्तांना आरोग्यप्राप्ती, अवघड शस्त्रक्रियांत यशस्वीतता, स्मृतीभ्रंश झालेल्यांना स्मृतीप्राप्ती, निपुत्रिकांना संतानप्राप्ती आदी असंख्य चमत्कार श्रीमहाराजांच्या कृपाशीर्वादामुळे भक्तजनांच्या अनुभवास आलेले आहेत. अशा या श्रीचिन्मयमूर्ती संस्थानला फार उच्च व पुरातन आध्यात्मिक गुरुपरंपरा प्राप्त आहे.
श्री चिन्मयमूर्ती संस्थान, उमरखेड मठाचा जीर्णोद्धार व नूतनीकरण विद्यमान मठाधिपती प.पू.श्री माधवानंद महाराज यांच्या कार्यकाळामध्ये दि. २६/३/२00६ ते दि. ९/५/२00७ या कालावधीत झाला. मठातील मुख्य दरबाजाच्या भिंतीवर याचा उल्लेख खालीलप्रमाणे कोरण्यात आलेला आहे.