|| श्री चिन्मयमूर्ती संस्थान, उमरखेड ||

एकाच आम्रफळात दोनशे भक्तांना आम्ररस भोजन दिले

graphic footer

एकदा श्रीतुकामाई आपले गुरुबंधू श्री रावसाहेब (पूर्णानंद महाराज) यांच्या भेटीसाठी शेवाळ्याला आले. तेथील श्री विठ्ठल मंदिरात जाऊन ते थांबले आणि तेथून श्री रावजीस (श्री रावसाहेब यांना) निरोप पाठविला की, आपण अन्नदानाद्वारे सर्वांस संतोषविता असा आपला लौकिक आहे. तरी आज आग्ररसाचे भोजन घालावे. निरोप आल्याबरोबर श्री रावजी त्वरित श्री विठ्ठलमंदिरी आले. श्री रावसाहेब श्रीतुकामाईंना म्हणाले की, “महाराज, यावर्षी साध्या तक्कूलाही आंबा मिळाला नाही तर रसासाठी आंबे कोठून मिळतील?'' असे श्री रावसाहेब म्हणतात तोच अचानक तेथे साक्षात्‌ श्री रुक्मिणीमाता एका स्त्रीच्या वेषात प्रगट झाल्या व त्यांनी देवापुढे एक आप्रफळ ठेवले.श्रीतुकामाईंनी तेच आम्रफ़ळ श्री रावजींच्या हातात देऊन म्हणाले की, हा आंबा घेऊन घरी जा व स्वयंपाकाची सिद्धता करा.

श्री रावसाहेब घरी आले आणि श्रीतुकामाईंनी दिलेला आंबा एका पाटावर ठेवला व आत पाकसिद्धता करण्यास सांगण्यासाठी गेले. नंतर बाहेर आले असता त्यांना एक आश्चर्य दिसले. त्यांनी पाटावर ठेवलेल्या एका आंब्याच्या जागी आप्रफळांचा एक मोठा ढीग तयार झाला होता.

ऐसा अगाध परमात्मा । कोण जाणे त्याचा महिमा ।
तुझी लीला सर्वोततया । तूच जाणसी ।।

त्या आंब्यांचा रस तयार करून जवळपास दोनशे लोक पोटभर जेवून गेले तरी श्रीतुकामाईंनी दिलेला एक आंबा तसाच राहिला होता.

जेवी महादेवाचे देणे । तैसेच केले वृकेंद्राने ।
शेकडो ब्राह्मणांसी पुरोन । रस उरे आणखी ।।
ब्राह्मणभोजन झाले । शेवटी ते फळ तैसेची राहिले ।
मग तुकाराम गेले । ग्रपरूपी ।।