|| श्री चिन्मयमूर्ती संस्थान, उमरखेड ||

भाविकांना दर्शनलाभ व सद्‌भक्तांस मोक्षदान

graphic footer

एकदा श्रीतुकामाई पुसद येथे त्यांच्या परात्पर गुरूंच्या - श्री विठ्ठल किंकर महाराजांच्या समाधी दर्शनासाठी आले. ही बातमी गावात कळताच त्यांच्या दर्शनासाठी भक्तगण प्रचंड गर्दीने जमा झाला. गर्दी इतकी वाढली की पोलिसांच्या जवानांनाही आवरता आवरेना. हे श्री तुकामाईंच्या लक्षात येताच ते श्री नृसिंह भगवंतांच्या देवळात शिरले आणि त्यांनी देवळाची दारे बंद करून घेतली. तेथेच ते गुप्त झाले व नदीतीरी प्रकटले. नदीच्या वाळवंटात एका मोठ्या दगडावर बसून तेथे सर्वांना त्यांनी दर्शन दिले. त्यावेळी एका भाविक म्हातारीला त्यांनी हाताने एक दगड दाखविला व दररोज येथे दर्शनाला येत जा असे ते तिला म्हणाले. म्हातारीने त्या दगडाकडे पाहिले असता तिला तेथे श्री तुकामाईच दिसले व जिकडे पाहावे तिकडे सर्वत्र श्रीतुकामाईच दिसू लागले. तेव्हापासून ती म्हातारी तेथे नित्यनियमाने दर्शनासाठी येई. पुढे भाविक भक्त व शिष्यमंडळींनी श्रीतुकामाईंच्या पादुका व मूर्तीची त्या ठिकाणी स्थापना करून देवालय बांधले व नियमितपणे पूजा-अर्चा व उत्सव सुरू केले. हेच शीळामंदिर होय.

म्हातारीने दगडाला पाहिले । प्रत्यक्ष वृकारामची द्सिले ।।
वळून तुकारामाकडे पाहिले । त्या ठिकाणी उभेच होते ।।
मग इकडे-तिकडे पाहिले । अष्टदिशा तुकाराम दिसले ।।
म्हातारीचे हृदय भरून आले । देहभान विसरली ।।
तुकारामांची स्ती स्थापिली । मूती जयपराहून आणिली ।।
नक्ठिलराव शिंदेंनी अर्पण केली । हे वर्णन नंतरचे ।।

नदीच्या वाळवंटावर सर्व भक्तमंडळींना मनसोक्त दर्शन देऊन व आजेगुरूंचे दर्शन घेऊन श्रीतुकामाईंची स्वारी येहळेगावी परतीच्या मार्गाने निघाली. वाटेत एका गावी एक अति वृद्ध बाई त्यांच्या दर्शनासाठी आली व श्रीतुकामाईंचे चरण घट्ट धरून म्हणाली, “तुकामाय! मी तुम्हाला शरणआले आहे. मी आता या देहाच्या कष्टाला पार कंटाळून गेले आहे. देह कधीतरी पडणारच आहे, पण अंतसमयी तुमचे चरण दिसणार नाही, म्हणून मी आताच तुमच्या चरणावर मस्तक ठेवते, माझ्यावर कृपा करा व माझा देह आताच तुमच्या पायी पडू द्या.'' असे बोलून ती म्हातारी मोठ्याने रडू लागली आणि काही केल्या श्रीतुकामाईंचे पाय सोडीना. श्रीतुकामाईसोबत श्रीगोचरस्वामी होते. ते श्रीतुकामाईंना म्हणाले, “दादा, म्हातारीचा भाव शुद्ध आहे, तिच्यावर कृपा करावी." श्रीतुकामाईंनी तिच्या डोक्यावर 'हात ठेवताच ती देहातीत झाली व मोक्षगतीस प्राप्त झाली. श्रीतुकामाईंनी तिचे अंत्यसंस्कार शास्त्रोक्त पद्धतीने करविले. तसेच तिच्या सर्व मुलांनाही भक्तिपंथाला लावले.