|| श्री चिन्मयमूर्ती संस्थान, उमरखेड ||

श्रद्धावान भक्तांना क्षणार्धात गोदास्नान घडवले

graphic footer

एकदा सूर्यग्रहण होते. बरीच मंडळी श्रीतुकामाईंच्या दर्शनासाठी येहळेगाव येथे जमली होती. वेळ सकाळी दहाची होती. पर्वकाळ एक-दीड तासावरच राहिला होता. इतक्यात श्रीतुकामाईंनी विचारले “चला, कोणास नांदेडला गोदावरी नदीत स्नान करायला यायचे आहे ते सांगा आणि माझ्यासोबत लगेच चला.'' सर्वांना वाटले की श्रीतुकामाई आपली थट्टाच करतात. कारण येहळेगावाहून नांदेड सोळा कोस (अंदाजे ५५ कि.मी.) अंतरावर असून एका तासात घोड्याद्वारेसुद्धा तेथे पोहचणे केवळ अशक्य होते; परंतु त्या भक्तमंडळीत दोघेजण भाविक व श्रद्धावान होते. ते श्रीतुकामाई सोबत जाण्यास तयार झाले. त्यांना श्रीतुकामाई म्हणाले, “चला मंदिराबाहेर.' मंदिराबाहेर आल्यावर त्या दोघांना श्रीतुकामाईंनी डोळे झाकावयास सांगितले. एका क्षणात श्रीतुकामाईसह ते दोघे नांदेडला गोदातटी उभे राहिले. सर्वांनी गोदावरी नदीत स्नान केले आणि पुन्हा डोळे झाकताच क्षणार्धात येहळेगावला परत आले. तेव्हा तेथील इतर मंडळींना आपण श्रीतुकामाईंना 'हो' न म्हटल्याबाबत फार वाईट वाटले.

पहा पहा निक्ष्याचे बळ । गुरुकृपे साधिला पर्वकाळ ।
अभक्तासी संशय जाळ । कृतकांने पडिला ।।