|| श्री चिन्मयमूर्ती संस्थान, उमरखेड ||

प.पू. श्री ब्रह्मचैतन्य हनुमंत महाराजांना अनुग्रह

graphic footer

अशाप्रकारे श्री तुकामाईंची मनोभावे भक्‍ती व सेवा करणाऱ्या मंडळींना श्री तुकामाईंचा कृपावर्षाव आजही त्यांच्या महासमाधीनंतरही होत आहे. श्री तुकामाईंनी महासमाधी घेतल्यानंतर जवळजवळ साठ वर्षांनी एक विलक्षण लीला केली. गोंदवल्यापासून सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावर वावरहिरे हे एक छोटे गाव असून श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे ते मूळ गाव. तेथे श्री हनुमंत महाराज घुगरद्रे नावाचे सत्पुरुष होऊन गेले (इ.सन.१९३४-१९६१). त्यांनी त्यांच्या वयाच्या तेराव्या वर्षीच श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे स्वानंद सुधाकर' नावाचे दीर्घचरित्र श्री तुकामाईंच्या आज्ञेवरून लिहिले. श्री तुकामाई, श्री बाणलिंग (शिव) मंदिरात पिंडीतून प्रगट झाले व हनुमंतबुवांना अनुग्रह दिला आणि पूर्वजन्मीचे श्री ब्रह्मचैतन्यांचे चरित्र लेखनाचा आदेश दिला. हे मंदिर वावरहिरे ब शिखरशिंगणापूर या शिवस्थानापासून जबळच आहे. श्री हनुमंत महाराज स्वानंद सुधाकर' मध्ये म्हणतात -

वयाचे त्रयोदश वर्षी | ग्राम नाये वावरहिऱ्याशी ||
तुकामाय महाराज निरश्‍चयेसी | स्वयंधू लिंगासी दर्शन देती ||
वावरहिरे पाणालिंग नगरी |
ज्यासी नजीक शिंगणापूर भू-कैलास पुरी ||
तेथ शिवाची भोरी | लिंगद्रय विवरी शोभताती ||
तेथ शिवलीलामृत पारायण | करता तुकामाय सुप्रसन्न ||
अगे प्रगटोन देत दर्शन | अभय कर आपण मस्तकी ठेवी ||
तो अग्रह झालासे पूर्ण | तेणे केळे यज पावन ||
दुजे कर्तव्य न उरेची जाण | एक स्वानंद सयाधान दिले तेणे ||
त्या स्वानंदी तो युधाकर | सदूणुरुराज विनटे खरोखर ||
त्या स्वानंद सुधाकर | दिधले निर्धार या ठायी ||
तुकामाय महाराज परब्रह्म | काखेत होते प्रिळू क्षान ||
देव अंगावरी टाकोन | म्हणे ब्रह्मचैतन्य चारित्र लेखन करी का ||
एवं वासनारहित करोन | चरणी विनटविले असे जाण || त्यांचे आज्ञेप्रमाणे लेखन | प्रारंभ जाण स्वानंदे ||

अशा प्रकारे श्री हनमुंत महाराजांना सद्गुरूंचे सद्गुरू ब्रम्हीभूत श्रीमत्‌ परमहंस श्री तुकाराम चैतन्यांनी लीलेद्वारे बाणलिंग पिंडीतून प्रगट होऊन अनुग्रह दिला व पुढे श्रीतुकामाईंच्या आज्ञेनुसार श्री हनुमंत महाराजांनी आत्मरूपे आत्मकथाच लिहिली व त्याला श्रीतुकामाईंनी तद्रूपता दिली.

न वर्णवे तूकेंद्र प्रताप | वर्णन करिता हरे ताप ||
मम मानसी शिरोनि चिद्रूप | आठवोनी देती ||
ही अगाध शक्ती अगोचर | हृदयी थेटवी परमेश्वर ||
ध्यानीयनी चरणी शिर | ठेवू निशीदिनी ||
धन्य केले गुरुराया | न भेटे कदा भवभया ||
पाठीराखा असता दृष्यादी याया | काय करील ||
ऐसा हा तूकेंद्राचा हिया | ज्यांचे स्वाधीन परमात्मा ||
श्रवणे पठणे हरुनी भवभ्रमा| भवरोग जातील ||
कित्येक तरले आणि तरती | हा निक्षय धरूनी दुढचित्ती ||
भक्तिभावे श्रीगुरुमूर्ति | परजावी आदरे ||

असा अगाध महिमा असलेले श्रीतुकामाईंचे दिव्य चरित्र असून धरतीचा कागद व समुद्राची शाई केली तरी त्याचे संपूर्ण वर्णन करणे केवळ अशक्‍य आहे. श्रीतुकामाईंच्या चरणी माझे कोटी कोटी प्रणाम.

धन्य येळेगांवीचे जन | त्यांते माझे लोटांगण | धन्य धन्य ते पुण्यधाम । जेथे जेथे चरण समर्थांचे ।। आसेतु हियाचल यात्रा | करी शतवेळा समस्त पुण्यक्षेत्रा | का नाना पएथ्की प्रदक्षणा कारिता | तेही पुण्य सर्वथा पासंगा न लगे ।। ते एकवेळ येवेगांव पवित्र | पाहता शाविक युपात्र । लाथे प्रमुख थोर | हे गुरुभक्तची साचार जाणती ।।