|| श्री चिन्मयमूर्ती संस्थान, उमरखेड ||

सद्‌भक्त श्री चंद्रभान बंगळे यांना आलेले दिव्य अनुभव

graphic footer

विठोलीचे श्री विठोबा बंगळे हे हरीभक्तपरायण होते. ते सपत्नीक दिंडीसोबत येहळेगावी श्री तुकामाईंच्या समाधी दर्शनासाठी आले. त्यावेळी त्यांच्या पत्नी गर्भावस्थेत होत्या. त्यांनी कबूल केले की गर्भातील बालक तुमचा दास आहे. नंतर विठोली येथे सन १९१४ मध्ये त्यांना पुत्ररत्न जन्मले. त्याचे नामकरण येहळेगावीच करावे असे श्री विठोबांनी सांगितले; पण मुलाच्या वयाच्या वीस वर्षांपर्यंतही या ना त्या कारणाने त्यांचे येहळेगावी जाणे झालेच नाही. लौकिकार्थासाठी श्री विठोबांनी मुलाचे नाव चंद्रभान असे ठेवले. वडील श्री विठोबा हे अध्यात्मातील अधिकारी पुरुष असून ते इतरांना दीक्षाही देत असत. वडिलांनी चंद्रभानला येहळेगावी जाण्यास सांगितले. त्याप्रमाणे आईसह चंद्रभान येहळेगावी श्री तुकामाईंच्या समाधी दर्शनाला आले. त्यावेळी मठात कारभारी (दिवाणजी), श्री. लिंबाजी (प.पू. पुरुषोत्तमानंद स्वामी महाराज) होते. तेथे चंद्रभानचे जावळे काढल्यानंतर ते जावळे त्यांच्या आईने पदरात घेऊन मठाबाहेर नेऊन टाकलेले असतानाही त्यांच्या पदरातून ते मठाबाहेर पडलेच नाही. म्हणून चंद्रभान आपल्या आईवर रागावले. इकडे जावळाचे केस श्री तुकामाईंच्या समाधीवर पडले असल्याचा चमत्कार सर्वांना दिसला.

मी आईला बोललो रागाने | माझे हात धरीले निंबाजीने ||
आईवर रागावू नये माणसाने | चला जावळं दाखवतो ||
आम्हला दरवाजात उभे केले | समाधीवर केस दाखविले ||
जावळे केस हाती घेऊन बोलले | तुकायायीचे चमत्कार ऐसे आहे||

पुढे १९३४ साली श्री चंद्रभान यांनी वडील श्री विठोबा यांच्याकडून दीक्षा ग्रहण केली. १९३६ साली त्यांना क्षयरोगाची बाधा जडली असता वडील श्री विठोबा यांच्या उपदेशाप्रमाणे त्यांनी एकवीस दिवस श्री तुकामाईंचा जप केला. श्री तुकामाईंनी श्री चंद्रभान यांना स्वप्न दृष्टांत देऊन त्यांच्या शिरावर वरदहस्त ठेवला व त्यास रोगमुक्त केले.

सदगुरू सारीखा | असता पाठीराखा |
रोगमुक्त झालो देखा | तुकामाईच्या तीर्थाने ||

श्री चंद्रभान यांचा मुलगा रामकृष्ण यास बालपणी खांडूक झाले असता त्यांच्या पत्नीने श्री तुकामाईंचे सोमवारचे पाच उपवास व नामजप केला. मुलास तीर्थ-अंगारा देताच तो रोगमुक्त झाला.

तीर्थ पाजले अगारा लावला | रामकृष्ण दुरुस्त झाला ||
तुकामायीच्या दर्शनाला | सावळीला नेले ||

श्रीतुकामाईंच्या मंदिराच्या वाऱ्या, उपवास, नामजप, पोथीची पारायणे, तीर्थ-अंगारा सेवन यामुळे अनेक रोगी असाध्य रोगांतून दुरुस्त झाले, अनेकांची संकटे निवारण झाली, अनेक निपुत्रिकांना संतानप्राप्ती झाली, सर्व भक्‍त-शिष्यांचे मनोरथ पूर्ण झाले. श्री. चंद्रभान विठोबा बंगळे यांनी अनेक शिष्य व भक्तमंडळींना श्रीतुकामाईंच्या दृष्टांत व प्रेरणेने श्री तुकामाईंच्या पोथीचे पारायण, श्रीतुकामाईंचे नामस्मरण, उपवास, वाऱ्या करणे, तीर्थ-अंगारा सेवन करणे असे विविध उपाय सुचविले असता त्याचा चांगला अनुभव कित्येक मंडळींना आलेला आहे. एकदा श्री चंद्रभान बंगळे यांच्या द्वितीय पत्नीला सूर्यास्तानंतर त्यांचे पिता श्री विठोबा महाराज, श्री तुकामाई व बग्णीचे मणीराम महाराज या संतत्रयींनी दर्शन दिले व त्यांचे संकट निवारण करून त्यांच्या मनाचे समाधान केले.

सूयस्तानंतर संत | माझे प्रिवा विठोबा महाराज ||
येहवळेगांवचे तुकाराय यहाराज | यणीराय यहाराज बग्णीचे ||
हे तिघेही झाले सयाधीस्त | प्रत्यक्ष तेथे आलेत ||
कंदील विठोबाचे हातात | एका हातात कुबडी ||
पाठीयागे वुकाराय | विदेही हातात विलीय ||
शगवे वस्त्र पररिधाटून | यणीरम त्यांच्या मागे ||