|| श्री चिन्मयमूर्ती संस्थान, उमरखेड ||

श्रीतुकामाईंची विविध उपासनास्थळे

graphic footer

बऱ्याचशा गावांना शिष्य-भकक्‍्त गणांनी श्री तुकामाईंच्या पादुका स्थापन करून देऊळे /मंदिरे उभारली व तेथे नित्योपासना सुरू केली. पूजन-अर्चन, नामजप, उत्सव-महोत्सव सुरू केले.

अशा श्रद्धावान लोकांनी | गुरुशक्‍्तीने बऱयाच ठिकाणी ||
तुकारापाच्या नाय साध्या माडूनी | पटका स्थापन केल्या ||

एकूण पंधरा ज्ञात स्थळी अशा नामसमाध्या असून याव्यतिरिक्‍तही आणखी सात ठिकाणे असल्याचे समजते. ही पंधरा स्थळे खाली नमूद केली आहेत. येहळेगावी मुख्य समाधी, फुलतांब्यात द्वितीय समाधी, पुसदला तृतीय पादुका स्थापन विधी, गोंदवल्यात चतुर्थ, सावळीत पंचम, वाघोड्यात षष्ठम, ठाकुरवाडा गावी सप्तम, अष्टम समाधी कुरुंदा, नववी समाधी शिणगी, परभणीत दहावी समाधी, हिंगोलीत एकादश समाधी, बारावी चोंढी-आंबा गावात, त्रयोदश समाधी खानापूर, चतुर्दश समाधी शिरपूर, पंचदश समाधी वाशिम. काही ठिकाणी देवालये बांधलेली आहेत. वरील पंधरा स्थानांपैकी पुसद आणि सावळी या गावांना श्री तुकामाईंच्या संगमरवरी मूर्ती देवालयात स्थापन केलेल्या आहेत. याशिवाय श्री. उत्तमराव देशमुख पात्रुडकर (जि. जालना) यांचे चिरंजीव श्री श्रीराम देशमुख ह.मु. औरंगाबाद यांच्या घरी देवघरात श्री तुकामाईंनी आशीर्वादपर दिलेली चिलीम नित्य पूजनात आहे. तसेच पुणे-फलटण एस.टी. बस मार्गावरील लोणंद या गावापासून ८-१0 कि.मी. अंतरावरील अंदोरी (ता. खंडाळा, जि. सातारा) या गावी श्रीतुकामाईंचा मठ असून तेथे नित्य पूजा- अर्चा-उपासना चालते. हा मठ 'बुआसाहेबांचा मठ' या नावाने प्रसिद्ध असून वै. प.पू. सद्गुरू श्री शंकरनाथ दगडे महाराज या मठाचे मठाधिपती होते. ते वयाच्या १0८ व्या वर्षी समाधीस्त झाले. सध्या त्यांचे सुपुत्र मठाचा कारभार पाहतात.