|| श्री चिन्मयमूर्ती संस्थान, उमरखेड ||

श्रीतुकामाईंचे महासमाधीग्रहण

graphic footer

बापूंच्या आगळ्यावेगळ्या अपरंपार सेवेमुळे त्यांचे सद्गुरू श्री तुकामाई संतोष पावले. एके दिवशी श्रीतुकामाईंनी श्री रामजीबापूंच्या हातात असलेला खराटा घेऊन श्री उद्धवबापूँंच्या मस्तकी मारला. श्री उद्धवबापू एकदम तन्मय झाले. श्रीतुकामाईंनी त्यांना साक्षात्‌ श्री पांडुरंगाचे दर्शन घडविले. श्रीगुरू कृपेमुळे त्यांना साक्षात्कार झाला व ते आनंदाने डोलू लागले. श्री तुकामाईकृपेने उद्धवबापू ब्रह्मर्पी समरस पावले.

ऐसे लोटले द्वादश संवत्सर | सेवा जाहली अपार |
सद्गुरू म्हणती करुणा पार | हा कृपेसी पात्र झाला ||
श्रीगुरुसी मनी वाटले | याचे भक्तीऋण साचले |
सर्वांपरीस आगळे | तोषविले मजलागी ||

श्रीतुकामाईंना वाटले की, याच्या भक्तीचे ऋण आपणावर फारच झाले. याचे ऋण फेडण्यासाठी आपल्याजबळ आता काहीच उरले नाही.

आता काही देण्यासी | उरलेच नाही मजपाशी |
पाहती कालावधीसी | म्हणती देवू आपले पद ||

एक दिवस श्रीतुकामाईंनी बापूंना बोलावले आणि म्हणाले, “बापू आम्ही आता परलोकी जाणार आणि त्यांना आपल्या जवळची छाटी व पादुका देऊन सांगितले की, तू आता श्री चिन्मयमूर्तींचा उत्सव करीत जा. तसेच पुढची व्यवस्था आखून दिली. यानंतर ज्येष्ठ शुद्ध पंचमी शके १८0९ (ई.स. १८८७) रोजी श्री तुकामाईंनी संन्यासदीक्षा ग्रहण करून “ब्रह्मानंद' हे नाव धारण केले. संन्यासदीक्षेनंतर ते तीनच दिवस राहिले. त्यानंतर शके १८0९, ज्येष्ठमास, शुक्लपक्ष, परम पवित्र अष्टमी तिथीला सद्गुरू श्री चिन्मयानंद स्वामींच्या पादुकेसमोर पद्मासन घालून श्री तुकामाईंनी येहळेगावी संजीवन समाधी घेतली.

आता काही देण्यासी | उरलेच नाही मजपासी ||
पाह्मती कालावधीसी | म्हणती देवू आपले पद ||
ऐसी सार्ग प्रतीक्षा करीती | तव प्राप्त झाली काळगती |
कळू आले सद्गुरुसी | बापूस बोलाविले ॥
आता समय समीप आला | आम्ही जातो परलोकाला ||
तुम्ही करावे महोत्सवाला | श्री गुरू चिन्मयाचे ||
हे छाटी आणि फडका | पूजी ठेवूनी भाव निका ||
चहुदेशी मागूनी भिका | श्रीजी उत्साहा करावे ||
ऐसे आज्ञापनी सत्वर | त्यागीते ज्ञाले कलेवर ||
सर्व जयमिळोनि जयकार | करिते झाले निजभक्त ||

श्री. चंद्रभान विठोबा बंगळे यांनी आपल्या 'श्रीगुरू परमहंस तुकाराम महाराज येहळेगाव चरित्र' या पंचवीस अध्यायी ओवीबद्ध पोथीत या प्रसंगाचे खालीलप्रमाणे वर्णन केले आहे -
एके दिवशी श्री तुकामाईंनी आपले शिष्योत्तमद्वय सर्वश्री रामजीबापू आणि उद्धवबापू (उपेंद्रस्वामी) यांना आपल्या उजव्या व डाव्या हाताला बसवून घेऊन दोघांनाही कवटाळले व त्यांना श्रीतुकामाई म्हणाले, “आता मी पंढरपूरला जातो. तुम्ही दरवर्षी सद्गुरू श्री चिन्मयानंद महाराजांचा पुण्यतिथी उत्सव भिक्षा मागून साजरा करत जा." श्री रामजीबापूंना स्मशानात राहण्याची आज्ञा करून त्यांना शुभाशीर्वाद दिले. श्रीतुकामाई उद्धवबापूंना म्हणाले, “नंतर डावीकडे पाहिले वळून/ बाप्या तू साझा वध चूुुरानन / हे छाटी - परदुका घेऊन / याचा सांभाळ करी //१६,८९// श्रीतुकामाईंचे हे निरवानिरवीचे शब्द ऐकून दोघांनाही महादुःख झाळे व ते धायमोकलून रडू लागले. श्रीतुकामाईंनीच त्यांची समजूत घालून त्यांना शांत केले. तेव्हापासून श्रीतुकामाई कोठे बाहेरगावी न जाता मठातच वास्तव्यास राहिले. श्री. बाबा नांगरे यांनी श्रीतुकामाईंना मठासाठी अर्पण केलेल्या जागेत यापूर्वीच मठाचे प्रशस्त बांधकाम करण्यात आले होते. या जागेत एक मोठा पिंपळवृक्ष होता. या पिंपळवृक्षाखालीच श्रीतुकामाई विश्रांती घेते असत. आपल्या समाधीग्रहणापूर्वी हीच जागा आपल्या समाधी स्थळासाठी श्रीतुकामाईंनी निर्देशित केली होती व त्यांच्या आज्ञेनुसार श्री. रामजी बापू व श्री. उद्धव बापू यांनी येथे अगोदरच बांधकाम करून घेतले. यानंतर श्रीतुकामाई हे श्रीरामजीबापू, श्री उद्धवबापू व तानूबाई या तिघांना आपल्या समवेत घेऊन उमरखेडला श्रीगुरू चिन्मयानंद महाराजांच्या समाधीच्या दर्शनासाठी आले. तेथे रात्री चार प्रहर 'गुरू महाराज गुरू, जय जय परब्रह्म सद्गुरू" या गुरुनामाचा गजर केला. नंतर दुसऱ्या दिवशी सर्वजण येहळेगावला परत आले. श्रीतुकामाईंनी रामजीबापूंना आज्ञापित करून मठात स्वयंपाक करायला लावला व नगरभोजन दिले. भजनाचा जागर करण्यात आला.

गणपती हनुमंत यांदिरात | दिंडी नेळून प्रजा करवीत |
ग्रायप्रदक्षिणा नाम गजरात | पुन्हा मठात आले ||

ज्येष्ठ शुद्ध अष्टमी, शके १८0९ सोमवार रोजी सकाळी श्रीतुकामाई श्रीरामजीबापू व श्री उद्धवबापू या दोघांचे हात धरून समाधीस्थळी उतरते जाहले.

शके अठराशे नव साली | ज्ये अप्टयीचे सकाळी | दोघांचे दंड धरूनी तुकायाऊल्ही | साधी जागेत उतरले || फपद्यासन घाळून बसले | नामस्मरण सुरू केळे | रामकृष्णहरी उच्चारिळे | उरध्वहरुणी लावोनी|| ऐसखिया सपयोगाची निरूती | त्गरह्मोने जे देह ठेविती | ते ब्रह्माविद होळी | पखह्य|| भगवंताच्या वचनाप्रमाणे | सद्गुरू तुकाराय यहाराजांनी | ज्येठ शुद्ध अष्ट्यी सोयवार दिनी | राय नामोच्चारे प्राण सोडला || काही वेळाने यान वाकली | वुकापाय वैकुंठवासी झाली | हे पाहून सर्व यंडळी | आक्रोशे रडू लागले ||

श्री रामजी बापू, श्री उद्धव बापू, तानूबाई, विठाबाई व इतर सर्व भक्तमंडळींनी आपला शोक आवरून ब्राह्मणांद्रारे गुरुदेहाची विधीयुक्‍त पूजा केली वब भोवती अकरा पोती मीठ टाकून समाधीमुखी एक शिळा ठेवली. श्री तुकामाईंनी समाधी घेतल्यामुळे लोक फार हळहळ करू लागले. सर्वांना पोरके झाल्यासारखे वाटू लागले. दर्शनाला अलोट गर्दी जमा झाली होती. बापूंनी गुरू आज्ञेप्रमाणे येहळेगावी श्रीतुकामाईंची समाधी बांधून त्यांच्या आज्ञेप्रमाणे सर्व उत्सव-महोत्सव साजरे करू लागले. असंख्य भक्तांच्या सहयोगातून १0१ फूट उंचीच्या मंदिराची उभारणी केली. त्याचा कळस ११ फूट उंच बांधला. हा मठ व इतर सर्व स्थावर- जंगम मालमत्ता श्री तुकामाईंनी आपल्या हयातीतच श्री चिन्मयमूर्ती संस्थान उमरखेडचे तत्कालिन मठाधिपती श्री सच्चिदानंद महाराज यांचेकडे स्वत: जाऊन गुरुगृही उमरखेड संस्थानला अर्पण केली होती. श्री तुकामाईनी जरी समाधी घेतली असली तरी भक्तांना त्यांची प्रत्यक्षाप्रमाणेच अनुभूती येऊ लागली. श्री बापू मात्र फारच दुःखी झाले. त्यांच्यात अत्यंत विरक्तता बाणली. काही दिवसांनंतर ते हिंगोलीस आले व तेथे त्यांनी श्रीतुकामाईंच्या पादुकांची स्थापना केली. अशी पाच वर्षे लोटल्यानंतर बापूंनी हंस संन्यास दीक्षा घेतली. दीक्षेनंतर त्यांचे नाव उपेंद्रस्वामी असे ठेवण्यात आले.

ऐसे पंचसंवत्सर लोटता | यनी वाटली विरक्तता ||
गृहस्थाश्रम साडूनी हंसरुपता | प्राप्त ज्ञाली गुरुराया ||
लक्ष लागले तुकेंद्रनासी | म्हणोनी नांव उपेंद्रस्वामी ||
सांडूनि विद्वतेची ऊर्मी | सदा चरणी निमग्न ||