|| श्री चिन्मयमूर्ती संस्थान, उमरखेड ||

पोटदुखीपासून मुक्‍ती

graphic footer

भारतातील संस्थाने विलीन होण्यापूर्वी येहळेगाव हे निजामशाहीत होते. निजामशाहीतील एक मुसलमान तहसीलदार सरकारी कामानिमित्त येहळेगावला आला होता. तो श्रीतुकामाईंच्या दर्शनाला आला. त्याला पोटशूळीचा जुनाट विकार होता. श्रीतुकामाईंनी त्याला बांधकामावरील पाट्या वाहायला लावल्या व दुपारपर्यंत त्याची पोटदुखी पूर्णपणे कायमची बरी झाली. त्याने खुश होऊन तेथील नाका कर रद्द केला.