|| श्री चिन्मयमूर्ती संस्थान, उमरखेड ||

समर्थाचिया सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे

graphic footer

एकदा श्री रामजीबापू श्रावणात श्रीतुकामाईंच्या दर्शनासाठी निघाले असता वाटेत पैनगंगा नदीस महापूर आलेला होता. श्रीतुकामाईंचे नाव घेऊन श्री रामजीबापू पुरात शिरले. इकडे येहळेगावी श्रीतुकामाई बाजेवर बसले होते. सभोवती बरीचशी मंडळी बसलेली होती. त्यावेळी श्रीतुकामाई एकदम म्हणाले, “राम्या, उदक आहे थोडे । तुझ्या अंगावरील कपडे । निश्चये राहतील कोरडे । साकडे काही मानू नको।।'' सभोवतालच्या मंडळीला आश्चर्य वाटले की श्रीतुकामाई कोणाशी बरे बोलत आहेत! त्यांना काहीच बोध होईना. काही वेळानंतर श्री रामजीबापू येहळेगावी येऊन पोहचले. त्यांनी श्रीतुकामाईंचे दर्शन घेऊन सर्व हकीकत सांगितली. तेव्हा कोठे जमलेल्या लोकांना पुराच्या पाण्याचे कोडे उमगले व श्रीतुकामाईंच्या बोलण्याचा उलगडा झाला. एकदा श्री तुकामाई कृपेने श्री रामजीबापू त्यांना अन्नातून करण्यात आलेल्या विषबाधेतून तसेच त्यांच्यावर जंगलात झालेल्या अस्वलाच्या हल्ल्यातून सुखरूपपणे वाचले. तसेच तळणीच्या एका स्त्रीची कडेवरील मुलगी श्रीतुकामाईंच्या वारीत अचानक झालेल्या दुर्धर रोगाच्या प्रादुर्भावामुळे एकाएकी मृत झाली असता श्री रामजीबापूंनी त्या लेकराला उचलून श्रीतुकामाईंच्या चरणावर घातले. त्यावेळी श्रीतुकामाई पलंगावर विश्राम करीत होते. श्रीतुकामाईंनी त्या लेकरास आपला पदस्पर्श केला, तो काय चमत्कार! ते मृत लेकरू जिवंत झाले.

तंव काय करी तुकामाय | लेकरावरी ठेवी पाय |
हाच झाला तरणोपाय | सरणोपाय संपला ||
मुलगी ती रड्डू लागली | तेव्हा तिची आई आली |
उचm बोलली | तुकायाय तिजलागी ||

श्रीतुकामाईंचे नामस्मरण करून बापूंनी खडकदरी गावच्या त्यांच्या पाटील शिष्याच्या मरणासन्न पत्नीला अंगारा लावताच रात्रीतून ती बाई खडखडीत बरी झाली.

बापू गेले बाजेवरी | अंगारा घेऊनी करी |
तुकामाय म्हणूनि शिरी | लावला त्या बाईच्या ॥
रात्रीतून आराय झाला | उठून बसली बाजेला |
पाटलास आनंद झाला | शिष्यवृत्ती दुरणावली ||