|| श्री चिन्मयमूर्ती संस्थान, उमरखेड ||

मूकं करोति वाचालम्‌ पंगु लंघयते गिरीम्‌ ।

graphic footer

त्यांच्याच कामावरील एका लोहाराची मुलगी आजारी पडून आंधळी झाली. तिला दोन्ही डोळ्यांनी दिसेना. तिला पाटलांनी सोमवारच्या पाच वाऱ्या करण्यास सांगितले. तिसर्‍या वारीलाच तिला दिसू लागले.

त्या मुलीला दृष्टी आत्तरी | लोहाराने व्यसने सोडली ||
ही गर्ता पसरली | दिग्रस शहरात ||

तसेच शामराव पाटलांचा पुतण्या वामन यास लहानपणी चालता- बोलता येईना. त्याने पाच वाऱ्या करताच त्यास गुण आला.

वामन बोलू - चालू लागला | पाच सोमवारी गुण आला ||
ही वार्ता कळली लोकांना | तेही तुकारामाच्या दर्शनाला येतात ||

माहोलीच्या लालसा जावरे (तेली) यांच्या तोंडाला पडलेले वळण श्रीतुकामाईंच्या नामजपाने दूर झाले. अनेक लोकांना अशाप्रकारे श्रीतुकामाईंचे अनुभव आल्यामुळे त्यांनी श्रीतुकामाईंच्या संस्थानासाठी आपल्या जमिनी अर्पण केल्या.