|| श्री चिन्मयमूर्ती संस्थान, उमरखेड ||

मुसळधार पावसातून रक्षिळी खळ्यातील ज्वारी

graphic footer

एकदा श्री तुकामाईंचे परमभक्त श्री. शामराव महिन्द्रे पाटलांचे ज्वारीचे खळे दिग्रस या गावी चाळू असता मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू झाली. त्यांनी श्री तुकामाईंचा धावा केला असता खळ्यातील ज्वारी अक्षरक्ष: कोरडी राहिली. काहीही नुकसान झाले नाही. ते त्वरित सावळीला गेले व तेथील श्रीतुकामाईंच्या मंदिरात सव्वाखंडी धान्य अर्पण केले.

गुरूचा नामजप सुरू केला| चार तासांनी पाऊस गेला ||
खळ्याच्या शेवती चिखळ झाला | नदि - नाल्याला पूर आला ||
सकाळी सूर्योदयात | खळ्यात जाऊन पाहतात ||
तो ज्वारी कोरडा करू लागली हावात | खळे कोरडेच दिसले ||