|| श्री चिन्मयमूर्ती संस्थान, उमरखेड ||

महापुरात बुडणाऱ्या नौकेतील भक्तांचे प्राणरक्षण केले

graphic footer

श्रीतुकामाईंनी लोकाग्रहास्तव येहळेगाव येथे स्वामी चिन्मयानंद महाराजांच्या पादुकांची स्थापना करून आषाढ व कार्तिक मासात उमरखेडप्रमाणेच उत्सव सुरू केले. एकदा काही भक्तमंडळी तुडुंब भरून वाहत असलेल्या प्रणीता नदीतून नावेत बसून येहळेगावी यावयास निघाली. त्या नावेस छिद्र असल्याचे कोणाच्याही लक्षात आले नव्हते. अर्ध्या मार्गात येताच नावेत पाणी शिरले. सर्वजण घाबरून गेले व आता आपणा सर्वांना जलसमाधी मिळणार या भीतीने त्यांनी श्रीतुकामाईंचा या संकटातून सोडवण्यासाठी धावा सुरू केला. आपल्या भक्तांचा धावा ऐकताच श्रीतुकामाई येहळेगाव येथे मठात बसलेले असताना तात्काळ गुप्तपणे धावून तेथे गेले व नाव सुखरूप पैलतीराला आणून पुन्हा पूर्वस्थळी परत आले. तो त्यांची वस्रे भिजलेली होती व त्यातून पाणी निथळत असल्याचे लोकांना दिसले. नावेतील भक्तमंडळी भरभर चालत मठात तुकामाईंच्या दर्शनास आली. त्यांनी अनन्यभावे त्यांना साष्टांग दंडवत घातले. तेव्हा कोठे इतरांना श्रीतुकामाईंच्या अंगावरील ओल्या वस्त्रांचे रहस्य उमगले.

निराशा मनी जाहली । धावली तेंव्ह्य तुकामाऊली ।
हात घालूनी नौकेतव्यी । लोटूनी आणली लक्‍मात्रे ।।
तत्काळ आणोनि निरी । सोडोनी गेले निर्धारी ।
कोठे असती कैवारी । चरण पाहू तयांचे ।।