|| श्री चिन्मयमूर्ती संस्थान, उमरखेड ||

प्रवाहपतितांना योग्य मार्गावर आणले

graphic footer

एकदा श्री तुकामाईसोबत बरीचशी भक्तमंडळी दिंडी घेऊन उमरखेडला निघाली. मार्गात तळणीला मुक्काम पडला. तेथे एका स्त्री भक्ताकडे श्री तुकामाई घरी गेले व तिला शेवळ्या खाण्यास मागितले. तिचा पती पाटील व्यसनी होता. श्री समर्थ रामदास स्वामींसारखे, श्री तुकामाईंनी शेवळ्या खाल्ल्या, वांती केली व पुन्हा तीच वांती खाऊ लागले. इतक्यात पाटील तेथे आला व म्हणाला की, 'हे घाणेरडे अन्न खाऊ नका. तेव्हा श्री तुकामाई त्यास म्हणाले, 'अरे पाटला, तू का मग असे घाण वागतो रे?' पाटलाला पश्‍चात्ताप झाला. तो श्रीतुकामाईंना शरण गेला व पत्नीसह दिंडीसोबत उमरखेडला वारीला निघाला.

तुकाराम गुरू बोलला | पाटलाला पश्‍चात्ताप झाला ||
अंतःकरणी सदय झाला | नमस्कार केला सद्गुरुंसी ||