|| श्री चिन्मयमूर्ती संस्थान, उमरखेड ||

हजूर, हुक्का जल रहा है ।

graphic footer

आपल्या मनाप्रमाणे घडून आल्यामुळे लोकांनी बरेचसे निजामी रुपये श्रीतुकामाईंच्या दारापुढे ठोकले. याबाबत कोणीतरी निजामाकडे तक्रार केली असता निजामाने एका मुसलमान नबाबास चौकशी करण्यासाठी येहळेगावला पाठविले. त्याने अगदी श्रीतुकामाईंच्या घरासमोरच तंबू ठोकला. श्रीतुकामाईंची परीक्षा पाहण्यासाठी नबाबाने आपल्या शागीर्दाला हुक्का तयार करण्यास सांगितले; पण त्यात विस्तव घालू नकोस म्हणून बजावले. नंतर त्याने श्रीतुकामाईंना आदरपूर्वक आमंत्रित करून लोडाशी बसविले आणि “ हुक्का लाव" असे शागीर्दास फर्मावले. नबाब अदबीने म्हणाला, “महाराज, दम लगाओ.'' श्रीतुकामाईंनी विचारले, “अंगार लगाया है ?"' शागीर्दाने खोटेच सांगितले, 'जी हाँ हुजूर, हुक्का जल रहा है,' ते ऐकून “जय सद्गुरू" असे म्हणून श्रीतुकामाईंनी दम लावला व तोंड भरून धूर सोडला. तिकडे आतमध्ये हुक्यातून ज्वाळा उसळून तंबूच्या छतापर्यंत लागल्या व त्याने पेट घेतला. मग मात्र नबाब घाबरला व श्रीतुकामाईंचे पाय धरून म्हणाला, “महाराज, कसूर माफ करो.” अशी क्षमायाचना करून तो श्रीतुकामाईंचा शिष्य बनला.

असे पातकी दीन मी स्वापीराया | परी पावलो सिद्ध व्हा उद्भराय ।।
नसे अन्य त्राता जगी या दीनाला | समर्था तुझ्याविण प्रार्शू कुणाला ।।

तेव्हापासून बरेच मुसलमान अधिकारी श्रीतुकामाईंच्या दर्शनासाठी येहळेगावी येऊ लागले.