|| श्री चिन्मयमूर्ती संस्थान, उमरखेड ||

देव देतो पण कर्म नेते

graphic footer

निजामाचे एक सरदार राजे रघोत्तमराव यांच्या दोन्ही बायकांपैकी एकीलाही मूलबाळ नव्हते. आपल्या दोन्ही बायकांसह ते येहळेगावला आले. डेरे, राहुट्या लावून गावाबाहेर मुक्कामी थांबले आणि श्रीतुकामाईंच्या दर्शनासाठी दररोज जाऊ लागले. आठ दिवसांनंतर परत जाण्याची परवानगी मागण्यासाठी राजे सहकुटुंब श्रीतुकामाईंच्या दर्शनास्तव आले असता, त्यांच्या दोन्हीही पत्नींना श्रीतुकामाईंनी पिठले-भाकरीचा प्रसाद दिला. बायकांना ते पसंत पडले नाही आणि घरी येताच दोघींनीही तो प्रसाद भक्षण न करता बाजूला ठेवून दिला. तो बाजूला पडलेला लेला प्रसाद संध्याकाळी भटजीच्या बायकोने खाऊन टाकला. राजे निघाले तेव्हा, “देव देतो अन्‌ कर्म नेते, ' एवढेच श्रीतुकामाई म्हणाले. राजेसाहेबांना शेवटी मूल झालेच नाही, पण भटजीच्या बायकोला पुढील वर्षी जुळे झाले.

जे जे काही करिसी ते ते माझे स्वहित |
हे तो सप्राचित कळो आले ||