|| श्री चिन्मयमूर्ती संस्थान, उमरखेड ||

कोणासही समाधी लावण्याचे अगाध सामर्थ्य

graphic footer

श्रीतुकामाई व त्यांचा सत्शिष्य मारुती एकदा नदीकाठी बसले असता समोरून एका घोड्यावर बसून नवरा-बायको असे दोघेजण जात होते. मारुतीने सहज विचारले, “'तुकामाय, माणसांप्रमाणे या प्राण्यांनाही समाधी लावता येते काय?" श्रीतुकामाई म्हणाले, “अरे, त्याला काय हरकत आहे!” श्रीतुकामाईंनी त्या घोड्याकडे बघून “हर हर हर' असे शब्द उच्चारताच तो घोडा, तो नवरा आणि ती बायको, तिघेही डोळे झाकून स्तब्ध झाले. दोन-तीन तासानंतर श्रीतुकामाईंनी “जा” म्हणताच ते घोडे नवरा-बायकोसह पुढे रवाना झाले.

यत्सत्येन जगत्सत्यु यत्प्रकाशेन विभातियतू |
यदानन्देन नन्दान्ति, तस्ये क्री गुरवे नमः ||