|| श्री चिन्मयमूर्ती संस्थान, उमरखेड ||

'मला ब्रह्म दिसले'

graphic footer

एकदा हरिपंत नावाचा मोजणीदार येहळेगावास आला होता. त्याने दररोज श्रीतुकामाईंकडे येऊन आग्रह धरावा की 'मला ब्रह्म दाखवा'. पण श्रीतुकामाई त्याच्याकडे पाहून नुसते हसत असत. त्यामुळे एक दिवस हरिपंताला राग आला आणि तो म्हणाला, “या तुकामाईचे येथे फारच स्तोम माजले आहे, यांना आता चांगलाच मार दिला पाहिजे.' असे म्हणून त्याने एका अरबाला श्रीतुकामाईस काठीने मार देण्यास सांगितले. त्या अरबाने हरिपंताच्या आज्ञेनुसार श्रीतुकामाईस काठीने मारण्यास सुरुवात केली. त्याबरोबर एक नवल वर्तले. छड्या श्रीतुकामाईंच्या पाठीवर बसू लागल्या आणि प्रत्यक्ष मार हरिपंताना बसून ते जोरजोराने विव्हळू लागले. त्यांनी अरबास 'मारणे थांबव, मला त्रास होतोय', असे ओरडून सांगितले. त्या क्षणीच हरिपंतास श्रीतुकामाईंची महती कळाली आणि त्याने श्रीतुकामाईंना साष्टांग नमस्कार घातला. पंताचा सर्व अभिमान गळाला. श्रीतुकामाईंनी त्याच्या अंगावरून मायेचा हात फिरविताच त्याच्या चित्तवृत्ती शांत झाल्या.

सर्व इंद्रिये आणि मन हे तुझे हाती आहे |
यास्तव आता तू लवलाहे, स्वपदी मन रमवावे ||