|| श्री चिन्मयमूर्ती संस्थान, उमरखेड ||

हस्तस्पर्श हा अमृतासमान

graphic footer

आता या मठात नित्य दर्शना्थींची गर्दी होत असे. त्यात सर्वच प्रकारचे लोक येत असत. एकदा श्रीतुकामाई एका धनगराच्या घरात कांदा व शिळी भाकरी खाऊन आले. त्यातील थोडी भाकरी त्यांनी आपल्यासोबत आणली आणि दर्शनासाठी जमलेल्या सर्व मंडळींना थोडी थोडी प्रसाद म्हणून वाटली. काही लोकांनी प्रसाद तेथेच खाल्ला, काहींनी तो आपल्याजवळ ठेवून दिला, पण एका अभक्त ब्राह्मणाने तो प्रसाद टाकून दिला व घरी येऊन 'विष्णवे नम:' म्हणून श्रीतुकामाईस दूषणे देऊ लागला. क्षणमात्र काळ लोटला आणि त्याचे दुर्धर पोटशूळ उठले. तो गडबडा लोळू लागला. त्याच्यावर केलेले सर्व औषधोपचार व्यर्थ ठरले. तेव्हा त्याचे नातेवाईक त्यास श्रीतुकामाईंकडे घेऊन आले व त्यांना शरण जाऊन म्हणाले 'माऊली, आता तुम्हीच याच्यावर दया करून याचा पोटशूळ थांबवा. श्रीतुकामाईंचे मन द्रवले व त्यांनी त्या ब्राह्मणाच्या पोटावरून प्रेमाने हात फिरविला. त्याच क्षणी त्याची व्याधी थांबली.

हात फिरविताची देखा | हारीले त्याचे पोटदुःखा|
संत दयाळू कैसे ऐका | अरिमित्रा समानाची ||

अशा प्रकारच्या कितीतरी लीला दररोज होऊ लागल्या.