|| श्री चिन्मयमूर्ती संस्थान, उमरखेड ||

सत्शिष्य श्री वामनराव सावकारांना मोक्षगती दिली

graphic footer

हिंगोली येथील श्री वामनराव सावकार श्रीतुकामाईंचे शिष्य होते; परंतु समंधबाधेमुळे ते महिना-महिना अन्न घेत नसत. शेवटी ते श्रीतुकामाईंना शरण आले. ते येहळेगावाला येऊन मठात राहिले. लाकडे फोडणे, पाणी भरणे, जमीन सारवणे ही कामे सेवा म्हणून त्यांनी पाच वर्षे केली. शेवटी सदगुरूकृपेने समंध निघून गेला व श्री वामनराव निरोगी होऊन हिंगोलीस जाऊन सुखाने संसार करू लागले. एकेदिवशी श्रीतुकामाई येहळेगावाहून तातडीने हिंगोलीला श्री वामनरावांकडे आले. त्यांचा अंतकाळ जवळ आला होता. श्री वामनरावांनी सद्गुरुचरणी देह ठेविला. श्रीतुकामाईंनी त्यांच्या मुलांकरवी त्यांचा अग्निसंस्कार नीट करविला; पण तिसऱ्या दिवशी पहाटेच श्रीतुकामाई एकटे स्मशानात गेले आणि श्री वामनरावांच्या अस्थी गोळा करून जलप्रवाहित केल्या. काही वेळाने मंडळी स्मशानात येऊन पाहतात तो गुरूने शिष्याच्या अस्थी गोळा केलेल्या दिसल्या. त्यांच्या प्रेमाचे सर्वांना फार कौतुक वाटले.

भाग्य उद्याचा ठसा | पावला तया पुरुषा |
न थेटे श्रीगुरू ऐसा | त्रैलोम्यात दुजा कोणी ॥
ऐसे नानापरी चाखि | दाविती तुकाराय विचित्र |
सहज ट्रष्टीने परत्र | करीती दीनाते ||

येहळेगावचे देवीचे देऊळ आणि मठाचे विस्तीर्ण माळवद याच श्री वामनरावांनी बांधले आहे.