|| श्री चिन्मयमूर्ती संस्थान, उमरखेड ||

आपणांसारीखे करीती तात्काळ

graphic footer

कव्हाणा या गावच्या एका शैव संप्रदायी गृहस्थाला तीन-चार अपत्ये होऊन ती सर्व पंडूरोगाने आजारी पडून बालपणीच वारली. नंतर नंद नावाचा एक मुलगा झाला. त्यासही वयाच्या अडीचव्या वर्षी पंडूरोग झाला. त्याच्या आई-वडिलांनी बाळ नंदला येहळेगावी आणून श्री तुकामाईंच्या चरणावर घातले असता श्रीतुकामाईंनी त्यास क्षणार्धात रोगमुक्त करून बालवयातच महाज्ञानी बनवले. हेच बाळ नंद पुढे नंदी महाराज झाले व अनेकांना त्यांनी उपदेश देऊन सन्मार्गाला लावले. ते वयाच्या नव्वदाव्या वर्षी कव्हाण्यात समाधीस्त झाले.

नन्द बाळ नामधारक झाले | नन्दाचे नंदी महाराज झाले||
अनेकांना उपदेशिले | सद्गुरू जाळे मराठ्यांत ॥
नन्दी महाराज गुरू बनले | नव्वदावे वर्षी आयुष्य संपले ||
कव्हामण्यात समाधिस्त ज्ञाळे | देऊळ बांधिले भाविकांनी ||

त्र्यंबकेश्‍वरी जन्मलेल्या नर्मदा यांना वयाच्या दहाव्या वर्षी सद्गुरू शोधार्थ घराबाहेर पडल्यानंतर वयाच्या चाळीसाव्या वर्षापर्यंतही सद्गुरूंचा उपदेश प्राप्त झाला नाही. शेवटी नाशिकला पंचवटीवर श्री यशवंतराव महाराज यांनी त्यांना मार्गदर्शन करून येहळेगावी श्री तुकामाईंकडे जाण्यास सांगितले. ते येहळेगावी येताच त्यांच्याकडे पाहून श्रीतुकामाई म्हणाले, 'यशवंतरावांनी तुला पाठविले ना? जा, तुझे काम झाले'. जवळच्या जगापुरी गावात त्यांना श्रीतुकामाईंनी जाण्याची आज्ञा केली. पेनगंगेच्या तीरावरील एका कडा डोंगरावर त्यांनी 'रामकृष्ण हरी' हा नामजप सुरू केला. श्री तुकामाईंच्या कृपेने आता ते र्मदा'चे “नर्मदाबुवा' झाले. त्यांचाही शिष्य परिवार वाढला. वयाच्या पंचाण्णवाव्या वर्षी श्री नर्मदाबुवा समाधिस्त झाले. वाकीच्या शिष्यमंडळींनी मिळून त्यांचे मंदिर बांधले आहे.

तुकामायीच्या कृपाप्रसादे | नर्पदबोवा झाले ज्ञाते ||
कर्म करूनी कृष्णार्पण म्हणत नव्हते | कृष्णार्पण उद्देशे कर्म करी||
वयाच्या प्रंचानवव्या वर्षी | नर्यदबोवा झाले कैवल्यवासी ||
ही वार्वा कळली वाकीसी | त्याच डोंगरी साधी स्थापिली ||

अशा प्रकारे श्रीतुकामाईंच्या सेवेत तत्पर अशा काही प्रमुख पुरुष व स्त्री शिष्यांची नावे म्हणजे - भीमाजीबापू फुटाणकर, चन्नाप्पा जंगम, नागो गवळी (मांडवा), रामानंद (नांदेड), मारोती नेरळकर, योगाभ्यासी हरणामाय, कीर्ततकारी राधामाय, वारकरी बनाबाई, विठाबाई, कृष्णाबाई व बायजाबाई. सेबली, ता. जि. जालना येथील कै. श्री. केशवराव कृष्णराव देशमुख यांना श्रीतुकामाईंकडून मंत्रदीक्षा मिळाली होती. श्री तुकामाईंनी आपल्या ताटातील घास घेऊन त्यांना संतोच्छिष्टाचे भोजन करविले. तसेच प्रसाद म्हणून श्वानपिल्लू दिले. त्यांची समाधी सेवली येथील श्री सिद्धमातेच्या मंदिरात असून समाधीस्त होण्याच्या तीन दिवस अगोदर त्यांनी संन्यासदीक्षा घेतली होती.

धन्य धन्य तुका माउली| युकळीत अवतरली |
येळेगावी प्रगटली | त्यांची कृपाअगाध ||