|| श्री चिन्मयमूर्ती संस्थान, उमरखेड ||

दगड-धोंडा बोले "विठ्ठल विठ्ठल"

graphic footer

लोहगाव दैठणचे निवृत्ती नावाचे एक कीर्तनकार तथा माहूरचे वारकरी हे एकदा लोकाग्रहास्तव येहळेगावला आले. त्यावेळी तेथील मठाचे बांधकाम हिंगोलीच्या श्री वामनराव सावकारांनी सुरू केलेले होते. निवृत्तींना स्वतःबद्दल गर्व होता व इतरांबाबत त्यांच्या मनात तुच्छता असे. त्यांचे पाऊळ मठात पडताच तेथील बांधकामाच्या दगडा-धोंड्यातून त्यांना विठ्ठलाचा नामगजर ऐकू आला. त्यांनी तात्काळ श्री तुकामाईंचे पाय धरून त्यांचे शिष्यत्व पत्करले. यावेळी श्रीतुकामाईंचे सत्शिष्य श्री. रामजीबापूंनी श्रीतुकामाईंच्या आज्ञेनुसार आयुष्यात प्रथमच उत्कृष्ट कीर्तन केले व हाच परिपाठ पुढे चालू राहिला.

निकृत्ती आले येहळेगावत | त्यांचा उजवा पाय पडला यहाद्रारात||
तत्काळ दगड-धोंड्यात | वडिल नायगजर पुरू झाला ||
तुकायायीचे चरणावरी | मस्तक टेकविले सत्क्री||
सद्गदित होऊनी अंतरी | क्षपा यागित्ली ||
ह्य वुकासायीचा चमत्कार | निकृत्तीचा गेला सूक्ष्म अहंकार ||
रामबापू झाले कीर्तनकार | अगाध कृपा सदरयुरूची||

आणखी तुकाराम ईसादकर व मरडग्याचे गणबा पाटील यांनी श्री श्रीतुकामाईंचे शिष्यत्व पत्करले.