|| श्री चिन्मयमूर्ती संस्थान, उमरखेड ||

निःस्सीम भक्तांना भवपाशातून मुक्‍त केले

graphic footer

श्रीतुकामाईकडून अनुग्रह मिळण्यास फार कष्ट पडत. त्यांच्या कसोटीला उतरणे अत्यंत कठीण बाब असल्याने त्यांचे खरे शिष्य चार- पाचच झाले.

कोणी भक्तीभावे | चरण धरिती स्वभावे |
त्यासी बीभत्स बोलूनी पहावे । कस कसोनी ॥
कसोटीस कोणी उतरे | त्याची सेवा घेई निरंतर |
ऐसे शिष्य प्राच चार | निज स्थळी असती||

येहळेगाव येथे श्रीतुकामाईंच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी वाढू लागली. कित्येकांना तीन-तीन दिवस तिष्ठत राहावे लागत असे. यास्तव श्रीतुकामाईंनी येहळेगावी बाबा नांगरे नावाच्या शिष्याला मठासाठी जागा मागितली. त्यानेही ताबडतोब मठासाठी जागा दान केली. श्रीतुकामाईंनीदेखील बाबा नांगरे याच्यावर कृपा करून त्यास त्रिकालज्ञानाची देणगी दिली. श्रीतुकामाईंचा भुजंगा नावाचा नि:स्सीम भक्त होता. तो सदैव त्यांची चिलीम घेऊन उभा असे. त्याचप्रमाणे दत्तरम नावाचा आणखी एक मोठा भक्त होता. तो श्रीतुकामाईंची अपार सेवा करी. त्यांना अतिसार होताच त्यांची वस्त्रे धुणे इत्यादी सर्व कामे तो भक्तिभावाने करी. या दोघांनाही श्रीतुकामाईंनी समाधी मार्ग दाखवून भवपाशातून सोडविले. श्रीतुकामाईंनी दोन कुत्रे पाळले होते. त्यांची नावे गण्या व टिट्या अशी होती. श्री तुकामाईंच्या डाव्या बगलेत टिट्या असे व गण्या हा श्रीतुकामाईसमोर बसलेला असून तो त्यांच्या मुखाकडे एकटक पाहत बसे. ही श्‍वानपिले वेदस्वरूपच होती. ती एकादशी पाळत. कार्तिक मासात दिंडीसोबत खिरापतीचा प्रसाद घेऊन श्री तुकामाईंचे दर्शन घेत. कधीकधी श्रीतुकामाई या दोन्ही श्‍्वानांना आपल्यासोबत आपल्या ताटात जेवायलासुद्धा बसवत असत. श्रीतुकामाईंची त्या दोघांवर व त्यांचीही श्रीतुकामाईंवर फारच प्रीती होती. गण्याचा अंतकाळ झाल्यावर श्रीतुकामाईंनी स्वहस्ते त्यास समाधी दिली. प. पू. श्री ब्रह्मचैतन्य हनुमंत महाराज वावरहिरेकर आपल्या 'स्वानंद सुधाकर' ग्रंथात म्हणतात-

डाव्या बगलेत काय ग्रंमत | इवानाचे पिळू धरूनि ठेवत |
त्याते प्रातिपाव्यी आनंदे अत्यत | दुसरे वागवित समोर ते ||
चारी वेदांचे केळे कुत्रे | वेद गुकपणी रहाती खरे |
आज्ञा फव्यीती ती फोरे | प्रेमे प्रातिणाळ करे समर्थ स्वायी ||
टिट्या; गण्या तयांचे नाय | कधी न रहाती सदूगुरूंसी सोडून |
धन्य धन्य तयांचे जीवन | तयांचे चरणी लोटांगण माझे हो ॥

शेषराव माजलगावकर यांना मूलबाळ नव्हते. दोघा पती-पत्नीने श्रीतुकामाईंचे दर्शन घेतले ब येहळेगावी राहून त्यांची मनोभावे सेवा केली. या सेवेचे फळ म्हणून त्यांना पुत्ररत्न झाले. त्यांनी त्या मुलाला मठाच्या सेवेसाठी अर्पण केले.
मारोती नावाचा सत्शिष्य श्रीतुकामाईंना दररोज बेलाची लाखोली वाहिल्याशिवाय अन्नग्रहण करीत नसे. श्रीतुकामाई कधी सहज भेटत तर कधी रानोवनी गेलेले असल्यास रात्र रात्र भेट होत नसे; परंतु तो बेलाची लाखोली श्रीतुकामाईंना वाहिल्याशिवाय अन्न घेत नसे, हा त्याचा दृढनिश्चय होता. त्याची निष्काम भक्ती श्रीतुकामाईंच्या कसोटीला उतरली आणि त्यांनी त्याची लिंगदेहाची व्याधी दूर करून त्यास सहजसमाधी मार्ग दाखवला.