|| श्री चिन्मयमूर्ती संस्थान, उमरखेड ||

कर्मठ ब्रह्मवृंदांना प्रचीती दिली व समाधी डोलविली

graphic footer

श्री चिन्मयमूर्ती संस्थान, उमरखेड येथे चैत्र कृष्ण एकादशीपासून पाच दिवस श्री चिन्मयानंद महाराजांचा मोठा उत्सव करण्यात येतो. यावेळेस भजन, कीर्तन, कथा, अन्नदान इ. कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर संपन्न होतात. एकदा श्रीतुकाराम महाराज या उत्सवासाठी उमरखेडला आले. त्यावेळी त्यांचे गुरुबंधू श्रीसहजानंद स्वामी (गोचर स्वामी) मठाधिपती होते. मठात ब्राह्मणांची भोजने सुरू करण्याची वेळच होती. गुरुबंधू श्रीसहजानंदस्वामीदेखील समोर उभेच होते. इतक्‍यात ब्रह्मवृंदांचे लक्ष श्रीतुकामाईकडे जाताच त्यांच्या मनात विचार आला की, आता ते पंक्तीत येतील, हे भ्रष्टाचारी कोणाचेही अन्न खातात, कोठेही राहतात, ते पंक्तीत आले तर भ्रष्टाचार होईल म्हणून ब्राह्मण उठून जाऊ लागले. हे श्रीतुकामाईंच्या लक्षात अंतर्ज्ञानाने आल्याबरोबर ते तेथून निघाले ते सरळ एका जैनाच्या घरी गेले व तेथे आनंदाने मिटक्या मारीत कांदा- भाकरी खात बसले. हा जैन श्रीचिन्मयानंद महाराजांचा शिष्य असून अध्यात्मामध्ये मोठा अधिकारी पुरुष होता.

जे अगोचर वेदांसी । तोचि गोचर जयासि । कर्मबंधन नसे त्यासी। सत्य सत्य । जो ब्रह्मानंदी तल्लीन । त्याची कर्मे कराया लागेन । ऋषी ठेविले स्थापोन । भगवंतांनी ।।

इकडे पंक्तीत वाढलेल्या सर्व पात्रांवर अन्नाऐवजी कृमी, कीटक व अस्थी दिसू लागल्या. त्यावेळेस सर्व ब्राह्मण व तेथे उपस्थित असलेली मंडळी आश्चर्यचकित झाली. आता काय करावे हे कोणालाच काही सुचेना. हा प्रकार श्रीगोचरस्वामींच्या कानावर गेल्यावर ते म्हणाले, " श्रीतुकामाईंचा कोणीतरी छळ केला असेल म्हणून असेच काहीतरी व्हायचे. आता तरी श्रीतुकामाईंना शरण जाऊन त्यांना येथे घेऊन या म्हणजे हे संकट टळेल." तेव्हा सर्व ब्रह्मवृंद मिळून जैनागृही गेले व श्रीतुकामाईंच्या चरणी लागले. त्यांची अहंवृत्ती गळाली होती. त्यांनी श्रीतुकामाईंची क्षमा मागून त्यांना मठामध्ये पंक्तीत आणले. तो काय चमत्कार ! पंक्तीत श्रीतुकामाई येताच पात्रावर असलेले कृमी, कीटक व अस्थी नाहीसे होऊन तेथे शुद्ध अन्न दिसू लागले.

पंगतीत येता योगी पवित्र । काय चमत्कार जाहला ॥
कृमी नाही अस्थी नाही । स्क्च्छ अन्न पात्री पाही ॥
शरणागत होऊनी द्विज पायी । लागती तुकयाचे ॥

ताबडतोब सर्वांनी श्रीतुकाराम महाराजांचा जयजयकार केला. सर्वांनाच श्रीतुकाराम महाराजांच्या अधिकाराची कल्पना आली. कस्तुरीला कोठेही लपवून ठेवले तरी तिचा सुगंध लपत नसतो. या घटनेमुळे त्यांची कीर्ती दूरवर पसरली. इकडे श्रीतुकामाई सरळ आपल्या गुरूंच्या समाधीपाशी जाऊन त्यांनी समाधीला साष्टांग नमस्कार घातला. श्रीगोचरस्वामी जवळच उभे होते. त्यांच्याकडे पाहून श्रीतुकामाई म्हणाले, “अरे हे उत्सवाचे ढोंग कशाला माजवले आहेस!'' श्रीतुकामाईंनी अत्यंत भक्तिभावाने गुरूंची मानसपूजा केली. त्यामुळे गुरू तूप्त होऊन समाधी डोलू लागली व समाधीतून एक धूसर आकृती बाहेर पडलेली क्षणभर सर्वांना दिसली. श्रीतुकामाईंना गुरूपूजेत तल्लीन झाल्यामुळे समाधी अवस्था प्राप्त झाली. गुरू-शिष्यांचे काहीतरी गूढ आध्यात्मिक संभाषण झाले व लगेच श्रीतुकामाई आपल्याच तंद्रीत मठातून बाहेर पडले.

ऐसी मानसपूजा । आवडली श्रीणुरुराजा
अनावर प्रेय वोजा । ड्रलु लागे
अतेरी प्रेस पारे । वरी समाधी डुले एकसरे
निजभक्त प्रह्मती निधारि । जयजयकारे गर्जती
काही कुटील अभक्तांनी शंका व्यक्त केली की जडतत्त्व चळेल हे खरे
वाटत नाही. त्यावर श्रीतुकामाईंच्या पोथीत स्पष्ट केले आहे की -
जो ब्रह्मांडाची घडी गोडी । करी एकेची काळा निरवडी
त्यासी समाधी चळण परवडी । काय असे
एथ्वी आप तेज |वागू हालवी सहज
तेथे सयाधीचे अगज । काय असे तया

असो. या घटनेनंतर श्रीतुकामाईंच्या दर्शनास येणाऱ्यांची संख्या वाढू लागली. त्यांच्या त्रासामुळे श्रीतुकामाई रानोमाळ पळत, पण लोक त्यांच्या मागेच धावत असत. ते लोकांना दगड मारीत, शिव्या देत, पण भक्त त्यांना सोडण्यास तयार नव्हते. कारण त्यांना तसे अनुभव येत होते. भक्तांची दिवसेंदिवस गर्दी वाढू लागली, गावोगावीच्या दिंड्या येऊ लागल्या, टाळ- मृदंग, हरिनामाचा गजर होऊ लागला. दर्शनार्थी लोकांच्या मनोकामना पूर्ण होऊ लागल्या. अनेकांच्या रोग-व्याधींचे निवारण, निपुत्रिकांना संतती, निर्धनांना धन, संकटे दूर होणे, उद्योग- नोकरी प्राप्त होणे इत्यादी फळे भक्तांना मिळू लागली. अनुभव येऊ लागले. त्यामुळे श्रीतुकामाईंच्या दर्शनासाठी अलोट गर्दी होऊ लागली.

श्रीतुकामाई येहळेगाव येथे पिंपळवृक्षाखाली बुडाशी टेकून बसून राहत किंवा विश्रांती घेत असत. भाविक, अभाविक, सकाम, निष्काम, श्रद्धावान, टवाळखोर असे सर्व प्रकारचे लोक तेथे त्यांच्या दर्शनास येत असत.

जे त्रैलोक्यी नाही दान । ते करिती संतसज्जन ।
तया संतांचे महिमान । काय म्हणौनी वर्णावे ।।