गुरु परंपरा
श्रीचिन्मयमूर्ती संस्थान, उमरखेडची गुरुपरंपरा ही नाथपरंपरा असून या परंपरेत योग व भक्ती यांचा सुरेख संगम झाला आहे. या संस्थानास दोन शतकांचा इतिहास असून आदिनाथांपासून ही गुरुपरंपरा श्रीचिन्मयानंद महाराजांपर्यंत व नंतर विद्यमान मठाधिपती प.पू. श्री माधवानंद महाराजांपर्यंत अविरतपणे सुरू आहे.
श्री चिन्मयानंद महाराजांचे ब्रह्मा, विष्णू व महेशस्वरूपी तीन अवतारी शिष्योत्तम म्हणजे - श्री सहजानंद महाराज (गोचरस्वामी उमरखेड, जे श्री चिन्मयानंद महाराजांचे उत्तराधिकारी होते), श्रीमत् परमहंस श्री तुकाराम महाराज (श्रीतुकामाई, ब्रह्मानंद महाराज, येहळेगांव) आणि श्री पूर्णानंद महाराज (शेवाळा) हे होत. श्री चिन्मयानंद महाराजांच्या महासमाधी ग्रहणानंतर श्रीसहजानंद महाराजांनी त्यांच्याच उमरखेडच्या राहत्या वाड्यात त्यांच्या समाधीची स्थापना करून श्रीचिन्मयमूर्ती संस्थानची मुहूर्तमेढ रोवली.
अधिक माहिती...